उडत उडत एक मक्षिका, देव घरांत ती शिरली,
पुजा साहित्य आणि मूर्तिवरी स्वच्छंदानें नाचूं लागली…१,
धुंदीमध्ये बागडत होती, मूर्तीच्या ती बसे शिरावरी
धूप, गंध आणि सुमनावरूनी, जाई मध्येच प्रभू चरणावरी…२,
पंख चिमुकले हलवीत ती, मूर्तीपुढें गांवू लागली
प्रसाद दिसतां पंचामृताचा, प्रभू अर्पिण्यासी झेपावली…३,
नैवेद्याच्या क्षीर सागरीं, आत्मसमर्पण तिने केले
प्रभू सेवेत तल्लीन होवूनी, जन्माचे ते सार्थक केले…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply