नवीन लेखन...

मला भेटलेला स्पायडरमॅन

स्पायडरमॅन पिक्चर पाहिल्यानंतर आपल्या अंगी अचाट करामती करता येण्यासारखी स्पायडरमॅन, ही मॅन, शक्तीमॅन किंवा हनुमॅन यांच्याप्रमाणे कुठलीही शक्ती नाही या विचाराने थोडा न्युनगंड आला होता. पण जवळ काहीही आॅप्शन नसल्याने तो ही थोडया दिवसांनी गेला आणि मी पुन्हा नॉर्मल झालो.

नंतर काही दिवसांनी कंपनीच्या कामानिमित्त बिहारची राजधानी पटन्याला गेलो होतो. हॉटेलवर चेक इन केले आणि चावी घेउुन रुमचा दरवाजा उघडला. एकूण पटन्याला साजेशी रुम होती. दरवाजा व्यवस्थित लागतो की नाही, नळाला पाणी येते की नाही आणि बाहेरच्या मरणाच्या उकाडयापासून बचाव करण्यासाठी एसी व्यवस्थित चालू आहे की नाही एवढे चेक केले. या सगळया गोष्टी बरोबर असतील तर जास्त त्रास होणार नव्हता. नशीबाने सर्व ठीकठाक होते.

बूट काढून बाथरुममध्ये जाउुन शॉवर चालूच केला होता की अचानक कोणतरी जोरजोरात दरवाजा वाजवू लागले. हा काय डोक्याला ताप म्हणून पटापट आवरून बाहेर येउुन दरवाजा उघडला तर वेटर घामाघुम झालेला.

“साहब अंदर आंउु?”

मी आत असताना हा आणि कशाला आत येतोय ते मला समजेना.

“क्यूं?”

“जरा बाजु के रुम मे जाना है.”

“तो जाओ ना.”

“आपके रुमसे जाना है.”

हा वेडा वगैरे आहे की काय असा मला डाउुट आला. नीट बाजुच्या रुमची बेल दाबून आतल्या माणसाला बोलवायचे सोडून हा माणूस माझ्या रुममध्ये का घुसखोरी करायच्या प्रयत्नात आहे ते समजत नव्हते.

“मेरे रुमसे ही क्यूं?”

मग मला पूर्ण प्रसंग समजला तो असा –

बाजुच्या रुममधून अर्ध्या तासापूर्वी जेवणाची आॅर्डर देण्यात आली होती. वेटर जेवण घेउुन आला आणि बेल दाबली तर आतून काहीही आवाज आला नाही. मग त्याने रिसेप्शनवर जाउुन रुमची चावी आणली आणि ती लावून पाहिली पण कस्टमरने आतून कडी लावली असावी. दरवाजा उघडत नव्हता. मग दरवाजाला कान लावून ऐकल्यावर त्याला कन्हण्याचा आवाज आला. कस्टमरचे वय साठाच्या आसपासचे होते त्यामुळे अजून काही इमर्जन्सी होण्याची वाट न पहाता तो वेटर माझ्या रुममधून बाजुच्या रुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होता. पण तो मार्ग एवढा सोपा नव्हता.

एकतर मी चौथ्या माळयावर होतो आणि माझ्या रुमच्या खिडकीतून बाहेरच्या गॅलरीत उतरुन तानाजी मालुसरेंच्या यशवंतीसारखे भिंतीला चिकटून हाताला लागेल त्याचा आधार घेत बाजुच्या रुममध्ये घुसणे मोठे चॅलेंज होते. मी दरवाजा का तोडत नाही हे विचारल्यावर “बाद में बनवाने को बहुत खर्चा आयेगा.” असे हॉटेलवाल्याचे मत पडले. नवीन दरवाजा बनविण्यापेक्षा एका रुममधून दुसर्‍या रुममध्ये जाण्याचे काम हा जानू नावाचा वेटर चुटकीसरशी करेल अशी हॉटेल मालकाला खात्री होती.

पण हा जानू लेकाचा स्वत:च्या जीवावर एवढा उदार का झाला होता ते कळत नव्हते. तिथल्या एवढया सगळया लोकांमधून जानूच मी कस्टमरला वाचवणार म्हणून पुढे आलेला! मी त्याला सेफ्टी बेल्ट किंवा कमरेला बांधायला दोरी वगैरे काय आणले आहेस का म्हणून विचारल्यावर तो हसायला लागला.

“साहब, जल्दी से जाने दो मुझे नही तो कस्टमर को अॅडमिट करना पडेगा.”

मी चटकन बाजूला होउुन त्याला खिडकी उघडून दिली. हा बाबा इकडून पडला तर पटन्याचे पोलीस पंचनामा करताना पहिल्यांदा माझी जबानी घेतील याची मला भीती होती. पण कुणाचातरी जीव वाचवायला तो प्राणाची बाजी लावत होता.

लगेच तो खिडकीबाहेरच्या गॅलरीत उतरून बाथरुमच्या पाईपांचा आधार घेउुन बाजूच्या रुममध्ये गेला आणि त्याने बाथरुममध्ये कन्हत पडलेल्या आजोबांना बाहेर काढले. पाय घसरुन पडल्याने आजोबांना मुळात उठताच आले नाही मग आतून रुमचा दरवाजा उघडायचा प्रश्नच येत नव्हता. पण या उपद्व्यापी जानूमुळे पडलेला कस्टमर आणि तुटणारा दरवाजा या दोन्ही गोष्टींना वाचवता आल्यामुळे मालक भलताच खुशीत होता.

त्यादिवशी स्पायडरमॅन होण्यासाठी मनगटातून दोर्‍या निघायची आवश्यकता नसते हे जानूने सर्वांना दाखवून दिले. अगदी जानूसारखा जीव धोक्यात घालायची गरज नाही पण आपल्या अवतीभोवती कितीतरी लोक असतात ज्यांना आपण जाता जाता सहज मदत करू शकतो. आपल्या दृष्टीने ते कदाचित खूप छोटे काम असेल पण तेवढ्याने दुसर्‍यांच्या आयुष्यातले एक कठिण काम सोपे होईल. दुसर्‍याचा हा आनंद शोधून छोटी छोटी मदत करायला शिकला की तुम्ही स्पायडरमॅन झाला म्हणून समजा.

© विजय माने, ठाणे

https://vijaymane.blog

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..