तीन मुलांची आई मी,
मला काय कमी ?
प्रत्येकाने घेतलीय चार महिन्यांची हमी ।।
चेंडू ह्या कोर्टातून
त्या कोर्टात टोलवताना
सुनबाई म्हणतात,
भावोजी बोलवतात त्यांना ।
वास्तविक इकडेच रहायचं नेहमी ।।
प्रत्येक घरी व्यवस्था मात्र
असते अगदी चोख ।
संपर्क टाळण्याचा
ज्याचा त्याचा रोख ।
स्वयंपाकात नको लुडबूड
बाहेर टी.व्ही. लावलाय आम्ही ।
आतल्या खोलीत आरामात पडून रहा तुम्ही ।।
ह्यांच्या घरी पाहुण्यांचं
येणं जाणं असतं ।
कोणी आलं तर बाहेर
मी डोकवायचं नसतं ।
स्वत:चा मान राखायचा असतो
मोठ्या माणसांनी ।।
— सुधा मोकाशी
Leave a Reply