पाऊस कधी मला समजलाच नाही.
किचकीचणाऱ्या डबक्यात,
मिचमीचणाऱ्या दिव्यात
कडाडणाऱ्या ढगात
कसला आलाय रोमांच.
पण
झुलणाऱ्या पानांत
मातीच्या तहानलेल्या सुवासात
निरागस टपोऱ्या थेंबांत
पाऊस कधी मी बघितलाच नाही.
आणि जेव्हा उधळली बरसात
गहिऱ्या प्रेमात
अबोल स्पर्शात
मनातल्या वादळात
गच्च डोळ्यांत,
पाऊस तेवढा चांगला पुन्हा कधी मला समजलाच नाही.
— कल्याणी
Leave a Reply