ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच….
पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे….
आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो…
मिऴालाच तर फोटोही देईन…..
पहिला महत्वाचा फरक बांधणीचा
.. याच खोड…बहुधा फणसाचे…. पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती…. आणी त्यातुन निघणार्या
रामरामरामरामरामरामरामराम…
आवाजानेच सुतार समाजाला..रामकातयो….. म्हणजेच रामखातयो….. हे नाव मिळालं असावं……
त्यातही श्रिमंतांचा ढोल तांब्याचा.
.. हे वेगळ वैभव…. वेगळा नाद….
दुसरी गोष्ट कुडा….. म्हणजे त्याला लावावं लागणारे चामडे…. यात एका बाजुला बैलाच … काठीने वाजवाण्याचं…. तर दुसर्याबाजूने बकर्याचं कातडं…. हातानं वाजवण्याचं……
आणी खास त्यांना बांधणिसाठी काकर….. बारीक चांबड्याची दोरी न गाठ बांधलेली अखंड काकर… हे ढोलाच्या मालकाचे वैभव….
आता शेवटची गोष्ट…. कुडाप….
म्हणजे ढोल वाजवायची काठी. खास माडाच्या शेल्यापासुन… म्हणजे ज्या भागाला नारळ लटकलेले असतात, त्यापासुन बनवलेले……. अत्यंत मजबुत, हलकी, सहज ऊपलब्ध आणि महत्वाचे म्हणजे अजिबात गाठ नसलेली….
तर असा ढोल जेव्हा देवळात वाजायचा तेव्हा 4 ते 5 किमी सहज ऐकू जायचा…..
आता गेले तेदिवस….
फोटोसुद्धा शोधुन मिळेना या ढोलांचा….
आता महत्वाचा फरक आवाजाचा…. आश्या ढोलातुन येणारा आवाज एका वेगळ्या लयीत रामरामरामरामरामरामराम.
असा आवाज देय़ील… फक्त मन लाऊन ऐका…..
तर आताचे सिंथेटिक ढोल… डमडमडमडम किंवा ढमढमढमढमढमढम असा आवाज देईल….
आणी असाच नाशिक ढोल ताफ्यातला ढोल देवळात वाजतांना सहज एखादा मालवणी म्हातारा बरळतोच….
अरे मायझयानु हयते कसले ढोल.? … हयते डबे वाजयताय…….
सरले रे ढोलाचे दिवस….. आता रवले ते आठवणी…….
खरच माझ्या कोकणच आणखी एक वैभव काळाआड गेलय….
बापूर्झा…..
डॉ बापू भोगटे….
Leave a Reply