Asit Sen’s Mamta movie …. to my mind …. one of the best creation in the global history of cinema …..!
सिनेमा सुरु होतो … नदीकिनाऱ्यावर मोनिश रॉय (अशोक कुमार) आणि देवयानी (सुचित्रा सेन) दोघं भेटलेले असतात. परिसर नक्कीच पश्चिम बंगालमधल्या सुंदरबनचा असावा. अशोक कुमार हा खानदानी आणि गर्भश्रीमंत घरातला असतो आणि देवयानी मात्र अत्यंत गरीब घरातली. मोनिश वकिलीतलं उच्च शिक्षण घ्यायला लंडनला निघणार असतो आणि त्या पूर्वी तो देवयानीला भेटायला आलेला असतो. साहजिकच दोघंही अतिशय हळवे झालेले असतात. देवयानी त्याच्याकडे बघत असते …. तो मग तिला म्हणतो की मी तुला पत्रं लिहेन …. एक अभी लिखा है … बम्बईमें पहुचुंगा … वहांसे पोस्ट करुंगा … एक जहाज से .. एक एडनसे … और फिर जब लंडन पहुचुंगा वहांसे ….. मनीष सांगतो … देवयानी म्हणते … भूल तो नही जाओगे … कैसी बाते कर रही हो तुम … मैने ये जिंदगीमें सिर्फ देवयानी को चाहा है …. दुसरी कोई लडकी कभी उसकी जिंदगीमें नहीं आयी … मैं तुम्हारे पास रहूँ या नहीं रहूँ … देवयानी … तुम्हारी याद हमेशा मेरे दिलमे रहेगी … एक बार फिरसे कहो … रहें ना रहें हम, महका करेंगे … बन के कली, बन के सबा, बाग़े वफ़ा में …मग ती दोघं त्या परिसरात फिरत … होडीतून जात राहातात आणि देवयानी गाणं म्हणत राहाते…. आणि आपण त्या पहिल्या तीन चार मिनिटात सगळं जग विसरून त्या दोघांच्या जगात पार हरवून जातो. इतके की पुढचे साडे तीन तास आपण देवयानी बरोबर सतत फिरत राहतो …. आपलं मन आणि डोळे सतत ओले होत राहातात.
देवयानीच्या वडिलांना दहा हजार रुपयांचं कर्ज असतं .. रेखाल त्यांच्या मागे हात धुवून लागतो … तो त्यांना म्हणतो … देवयानी मला दे आणि तुझं कर्ज मी फिटलं असं लिहून देतो. रेखाल अत्यंत घाणेरडा माणूस असतो. दारुडा आणि बाहेरख्याली. मोनिशने तिला जातांना सांगितलेलं असतं की तुला काही मदत लागली तर तू माझ्या आईकडे जा. त्या प्रमाणे ती अत्यंत जड मनाने त्याच्या आईकडे जाते. पण ती देवयानीचा खूप अपमान करते. तुझी नजर आमच्या पैशाकडेच आहे वगैरे बोलून तिला घरातून हाकलून लावते. तरणोपाय नसल्याने ती रेखालशी लग्न करते. पुढे ती खूप उदास होते … सगळ्यावरचा तिचा विश्वास उडतो आणि ती घरातून पळून जाते. ट्रेनमधून उडी मारताना तिला एक वृद्ध स्त्री परावृत्त करते. ती स्त्री तिला लखनौला आपल्या घरी घेऊन येते. ती तिला नाचगाणं शिकवायला सुरवात करते. देवयानीला रेखालपासून दिवस गेलेले असतात. तिला त्याच्यापासून एक मुलगी होते. सुपर्णा. ती वृद्ध स्त्री देवयानीला आपल्या मुलीसारखंच वागवत असते. देवयानी नाचगाण्यात प्राविण्य मिळवते आणि ती पन्नाबाई म्हणून लखनौ कानपूरला प्रख्यात होते.
मधल्या काळात सुपर्णा खूप आजारी पडते. तिला डॉक्टरकडे घेऊन जातात. थोडंसं बरं वाटल्यावर चुणचुणीत असलेल्या सुपर्णाला एखादया चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत घाला असं सांगतात. डॉक्टर अब्राहम पुढे सांगतात की तुम्हाला मी नक्कीच शिफारसपत्र देईन. पण देवयानीच्या ती काळजाचा तुकडा असते आणि तिला दूर ठेवायची तिची बिलकुल तयारी नसते. मधल्या काळात रेखाल सुपर्णाला बागेत फिरायला गेलं असताना पळवतो. ओरडाओरड झाल्यावर ती परत मिळते पण आता देवयानीला खूप भीती वाटते. ती डॉक्टरांकडून शिफारसपत्र घेऊन कॉन्व्हेंटमध्ये जाते. स्वतःबद्दल सांगते … काहीही न लपवता. तिथली मुख्य काही हे सगळं ऐकून प्रवेश देत नाही. पण शेवटी ती तिला वचन देते की मी कधीही ही माझी मुलगी आहे, असं सांगणार नाही की कधी तिला भेटायला येईन. शेवटी तिला त्या शाळेत प्रवेश मिळतो.
काही काळाने मोनीश परत येतो आणि लखनौला आपला व्यवसाय सुरु करतो. तो अगोदरच खूप प्रतिष्ठित असतोच आता तर इंग्लंडहून शिक्षण घेऊन आलेला असतो. तो देवयानीचा शोध घेत असतो. तो तिला एका मोठया दुकानात बघतो आणि चमकतो. बरोबरचा माणूस सांगतो की लखनौची बडं नाव असलेली मुजरेवाली आहे …. पन्नाबाई. तो खूप अस्वस्थ होतो. तो त्याला सांगतो की तिला गाण्यासाठी घरी बोलाव. ती येते .. तो बघतो आणि खूप अस्वस्थ होतो. ती त्याला सगळी कहाणी सांगते …. ती त्याच्या घरी गेली गेल्यापासून ते त्या क्षणापर्यंत. दोघंही बराच वेळ निशब्द होतात. शेवटी ती त्याच्याकडे मागणं मागते की तूच आता सुपर्णाचा पिता आहेस आणि तिला मोठी झालेली मला बघायच्येय. मोनिश ही जबाबदारी मनापासून स्वीकारतो ….. सुपर्णा मोठी होत जाते ….. ती देखील वकील होते …. अशोक कुमार देवयानीला हे सगळं दाखवत असतो …. तिच्यातल्या आईच्या चेहेर्यावरचं …. डोळ्यातलं समाधान … आनंद बघत असतो ….
इतकी उच्च मुल्य असलेला …. मुलीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेली ती आई …. आपण सिनेमाच्या गोष्टीत पूर्णपणे हरवून जातो. आसित सेन यांच्याकडून इतकी सुंदर कलाकृती तयार झाली की आज पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला तरी ममता बघताना आजच्या पिढीच्या लोकांचीही मनं क्षणात ओली होतात. बिमल रॉय यांचं शिष्यत्व लाभलेल्या आणि पूर्व बंगालच्या ढाका इथे जन्मलेल्या असित सेन यांनी ममता … खामोशी …. सफर …. अनोखी रात …. असे एकाहून एक अजरामर सिनेमे काढले. याला चार चांद लावले ते दिग्गज संगीतकार रोशन यांनी. त्यांनी यातली गाणी अशी रचली की त्यात सिनेमाच्या गोष्टीतली सगळी हळवी भावना रसिकांची हृदयं ओलीचिंब करती झाली. मग ते छुपा लो यूं दिलमें प्यार मेरा असो की रेहेते थे कभी जिनके असो …. मजरुह सुलतानपुरींच्या शब्दांना रोशनने आपलं अक्षरशः हृदय ओतलंय ….. की रसिकांच्या मनात ही गाणी गेल्या पन्नास वर्षांच्यावर रुंजी घालत आहेत. माझ्या मते ‘ममता’ हा जगातल्या सिनेनिर्मितीतला एक अत्यंत सुंदर सिनेमा आहे, हे नक्की.
हा सिनेमा बंगालीतल्या असित सेन यांच्याच ‘उत्तर फाल्गुनी’ वरून केला गेला. मनाला सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे सुचित्रा सेन हीने साकारलेली प्रेमिकेची … हतबल स्त्रीची …. आईची भुमिका. तिच्या व्यक्तिमत्वांतच असं काहीतरी वेगळं … भारदस्त आहे की आपण तिची भुमिका बघताना खिळून जातो. या सिनेमात तिचा डबल रोल आहे. सिनेमातला प्रत्येक क्षण ती आपल्याला व्यापत असते. मनाला सतत तिची ओढ लागते. अर्थात अशोक कुमारने अतिशय सुंदर आणि सहज काम केलंय .. त्याच्या … मोनिशच्या व्यक्तिमत्वाची आपल्याला एकदम आतून भुरळ पडते. स्त्री पुरुषाचं प्रेम किती उदात्त … सुंदर असू शकतं, हे आपल्याला क्षणोक्षणी जाणवत राहतं ….. अगोदर जरी बघितला असेल तरी जाणत्या वयात निवांतपणे परत बघा ….. रोजच्या जगण्याने … संघर्षाने कोती झालेली आपली मनं परत ओली होतील …. तो अनुभव कधीही न विसरता येण्यासारखाच असेल … आणि मग रहें ना रहें हम, महका करेंगे या शब्दातली …. भावनेतली …. देवयानी-मोनिश यांच्या प्रेमातली दिव्यता आपण अजून पुढे २५ वर्ष तरी मनापासून गुणगुणत राहू…..
रहें ना रहें हम, महका करेंगे
बन के कली, बन के सबा, बाग़े वफ़ा में …
मौसम कोई हो इस चमन में
रंग बनके रहेंगे इन फ़िज़ा में
चाहत की खुशबू, यूँ ही ज़ुल्फ़ों
से उड़ेगी, खिज़ायों या बहारें
यूँही झूमते, युहीँ झूमते और
खिलते रहेंगे, बन के कली बन के सबा बाग़ें वफ़ा में
रहें ना रहें हम …
खोये हम ऐसे क्या है मिलना
क्या बिछड़ना नहीं है, याद हमको
गुंचे में दिल के जब से आये
सिर्फ़ दिल की ज़मीं है, याद हमको
इसी सरज़मीं, इसी सरज़मीं पे
हम तो रहेंगे, बन के कली बन के सबा बाग़े वफ़ा में
रहें ना रहें हम …
जब हम न होंगे तब हमारी
खाक पे तुम रुकोगे चलते चलते
अश्कों से भीगी चांदनी में
इक सदा सी सुनोगे चलते चलते
वहीं पे कहीं, वहीं पे कहीं हम
तुमसे मिलेंगे, बन के कली बन के सबा बाग़े वफ़ा में …
रहें ना रहें हम, महका करेंगे …
(Duet Version)
है ख़ूबसूरत ये नज़ारे
ये बहारें हमारे दम-क़दम से
ज़िंदा हुई है फिर जहाँ में
आज इश्क़-ओ-वफ़ा की रस्म हम से
यूँही इस चमन, यूँही इस चमन की
ज़ीनत रहेंगे, बन के कली बन के सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम …
https://www.youtube.com/watch?v=BDAyzXC-ayE&t=199s
Full Movie’s youtube link :
(सिनेमावर कितीही लिहिता येईल ….. हे काही परीक्षण वगैरे अजिबात नाहीये ….. सिनेमा बघितल्यावर मनाला जसं वाटलं ते तसंच्या तसं लिहिलंय …. मला सुचित्रा सेनने खूप भुरळ घातली ….तिच्यातल्या वेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने …. माझ्यातल्या लेन्समनला तर खूपच ….. मला तिचे फोटो काढायला खूप आवडलं असतं …. अर्थात ही आता नुसतीच कल्पना ….. तिच्यावर मात्र कधीतरी खास लिहिणार आहे ….. खूप वाचलंय मी हा सिमेना बघितल्यावर …. त्या साठी एखादे वेळेस कोलकात्याला जाईनही … बघू …. )
— प्रकाश पिटकर
Leave a Reply