का कुणास ठाऊक
मन आज शांत शांत आहे,
रिक्त क्षण सारे भवतीचे
हृदय बावरे जरासे आहे
सांज सावली ही
गूढ गहन भासतं आहे,
मी कोण खरी माझेच
प्रतिबिंब विचारत आहे
पडले प्रश्न मनात कितीक
काहूर अंतरी दाटले आहे,
दूर देवळात होतो घंटा नाद
मन कुठे अवचित हरवले आहे
पडले प्रश्न कित्येक ते
उत्तर कुठलेच न मिळतं आहे,
येईल एक लाट वादळी अशी
ही शांतता वादळापूर्वीची आहे
उठले काहूर मनात हलकेच
मी पुरती निःशब्द आता आहे,
वेड्या मनास कोण न समजे
वेडे भाव इथे अंतरात मिटून आहे
हृदयातील सल हळवी बोचरी
हृदयस्थ भाव व्याकुळ आहे,
चुकेलं जे त्याचा हिशोब मग
देवाला तो ज्ञात सारा आहे
अंतिम इहलोकी जाता
हिशोब सारा चोख तो आहे,
आहे मंदिरात देव दगडाचा
परी देवत्व मूर्तीत सामावून आहे
का हुरहूरते मन अचानक
कातरवेळ काटेरी आज वाटे,
कितीक मनात उठले तरंग सारे
नशिबापुढे सारे पराधीन आहे
कितीक व्याकुळ झाले मी
तुझीच प्रतिमा अंतरी आहे,
शल्य उरात लपले खोल असे
वेदनेचे गाव कोणास कळणार आहे
नाव एकाकी चालली अशी
पाण्यात तरंग उठले आहे,
खळबळ मनात कितीक सारी
तुझीच कमी आज भासतं आहे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply