अंतरी रूप पाझरते
स्मरण नेत्री ओघळते…
सांग ! कसे विसरावे
मनआभाळ ते दाटते…
श्रावण, प्रीतबरसला
लाघव ते रिमझिमते…
मृदगंधलेली, सुगंधा
गगना भारूनी जाते…
व्योमात कृष्णसावळा
ब्रह्मात, पावरी घुमते…
लडिवाळ नाद मधुरम
मनी भक्तीप्रीत प्रसवते…
हेच भाग्य साक्षात्कारी
जन्मोजन्मी, सुखावते…
ती राधा अन ती मीरा
आत्माच समर्पूनी जाते…
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.१९१
८/८/२०२२
Leave a Reply