मन बावरा पक्षी उडतो कल्पनांच्या आभाळातून,
अंतरातून हाक देतो, विराण त्या जीवनातून,
दिगंतराच्या जवळ जातो विराट त्या उड्डाणातून,
दिशादिशांना आवाज देतो, अंतर्नादाच्या शांत शीळेतून,
सभोवार ढगात वावरतो विशाल पंख फैलावून,
एकटाच मस्तीत जगतो, गजबजत्या दुनियेत राहून,
धरेवरुनी नभात जातो, आत्मिक सारे बळ घेऊन,
प्रचंड इच्छाशक्ती राखतो उदंड आभाळा मात देऊन,-
एकटाच त्याच्याशी लढतो, झुंज खेळून परतून,
कमकुवतपणा सोडतो
ठाम निश्चय करुन,–!!!
बल सारखे वाढवतो, खंबीर निर्धार करुन,
कायमचा वर उठतो, भय भीती भावनांतून,–!!!
पुऱ्या विश्वाला झुगारतो पटकन भरारी घेऊन,
जिंकतो, जो लढतो, मापदंड यशाचा नसून,
अमर्यादपणे ना झेपावतो, उंचावर दिमाखाने बघून,,
कर्तृत्वाने उडत राहतो-!!
जग लहानसे भासूंन,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply