मन दाटून येते
भाव उमलून जाते,
लाज गाली विलसते
तुझी सय अंतरी उमलते
भाव कल्लोळ मनात
तुझ्या मिठीची आस,
क्षण गंधाळून हृदयात
तूच अबोल मनात बहरुन
शब्द शब्द तुझ्या माझ्यात
अर्थ येतो शब्दांत फुलून,
ह्या सागर लाटा बेभान
कशी आवरु माझे मन
हा वारा ही अवखळ
करतो कानात कुजबुज,
कातर वेळी तू सख्या भेट
सुर्य साक्षी असेल सांज मनोहर
नको कसले शब्द त्या क्षणी
स्पर्श तुझ्या मिठीचा मोहरुनी,
थेंब थेंब ओला अंतरी झिरपून
अबोली लाजेल मोगऱ्यात लाजुन
चिंब तनमन ओले भिजून
तुझ्या स्पर्शाचा आवेग ओढून,
मन मोहरले माझे अलवार तुझ्यात
निसर्ग खुणावतो मज मन बेफाम तुझ्यात
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply