आजकाल मनावर होतात आघात
आतामात्र मन खुपच हळवं झालय
खरं तर, सारंकाही सोसलं पाहिजे
कळतय तरी देखील कळेना झालय
सुखानंदाची व्याख्या बदलली आहे
भोगवादी सुखाकडं हे जग धावतय
आपलेपणाची जाणीव शून्य झाली
नात्यानात्यातली दरी मात्र वाढलीय
जन्मदाते, ऋणानुबंध फक्त नावाचेच
आस्थे ऐवजी अनास्था रुजु लागलीय
खरं तर जसं वारं वहातं तसच वहावं
हाच सुखाचा सोपा मार्ग वाटू लागलाय
एक दिवस सारं चक्र थांबणार आहे
कलियुगी जगण्याचे तंत्रच बदललय
जीवनात फक्त स्वसुखासाठी जगावं
त्याग, निरपेक्ष समर्पण सारं संपलय
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३४.
१० – ५ – २०२२.
Leave a Reply