घन आषाढी, गगन सावळे
मीलना आसुसलेली वसुंधरा
चिंबचिंबला पाऊस ओला
स्मृतींच्या झरझरती जलधारा…।।
हिरवळलेली सुंदरा अनुपम
माहोल लोचना दीपविणारा
धुंद क्षण क्षण, मन फुलारू
ऋतुवर्षाचा, सोहळा न्यारा…।।
जीवा जीवाला झुलविणारा
बेधुंद मृदगंधला अवीट वारा
प्रीतभावनांचा स्पर्श अनावर
अधिर, प्रीतासक्ती गंधणारा…।।
शब्दाशब्दातुनी ओढ लाघवी
अंतरात झुळझुळतो प्रीतझरा
घन आषाढी, गगन सावळे
मीलना आसुसलेली वसुंधरा…।।
रचना क्र. ६३
३०/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
Leave a Reply