मन झाले फुलपाखरू
मन झाले फुलपाखरू
जीवन जगताना
गती स्वैर किती
मनाचा ठाव कोणा किती?
असते आपल्याच खुशीत
मनाचा लपंडाव कोणा कळला?
मन भरून राहिला कोपरा
देत राहिला ठोकरा
मन मनाच्या साखळ्या
गुंतता गुंती गुंता
सोडविण्या त्या सगळ्या
हैराण जीव पुरता
मन मनाचा मोठा गुंता
गुंता तुटता ना सूटता
मन मनाचे द्वैत
भांडते आतल्या आत
होण्या मन मोकळे
भटके स्वच्छंदे रानोमाळी
पळे इकडून तिकडे
फिरे गरगरा भोवऱ्यावाणी
मन थकले फिरफिरून
बसले एका फुलावर
फुलपाखरावीण
समजले त्याला जीवन !
— जगदीश पटवर्धन