एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला स्नान घातले आणि शेवटी बुध्दांकडे गेले. बुध्दांनी त्यांना विचारले की कशी झाली तिर्थयात्रा त्यावर सर्वांना आपआपला अनुभव सांगीतला आणि सर्वांना खुप चांगले वाटले सर्वजण प्रसन्न वाटले . सर्वांचा अनुभव ऐकल्यांनंतर बुध्दांनी त्यांना ती काडी चावण्यास सांगीतले. सर्वांनी सांगीतल्याप्रमाणे ती काडी चावली तर सर्वांची चेहरे पाहण्या लायक होते .काडीचा कडुपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसु लागला . सर्वांच्या तिरकस नजरा बुध्दांकडे होत्या. त्यावर बुध्दांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिर्थस्नान केले त्या त्या ठिकाणी या काडीने सुध्दा तिर्थस्नान केले . जसे तुम्ही पापमुक्त झालात तसेच ही काडीसुध्दा पापमुक्त व्हायला पाहीजे होती . तिर्थस्नानचा परिणाम या काडीवर सुध्दा व्हायला पाहीजे होता. त्यामुळे ही काडी गोड व्हायला पाहिजे होती परंतू तसे झाले नाही ती काडी कडुच राहीली . त्याप्रमाणे आपणाला सुध्दा शरीरशुध्दी करायची असेल तर ती आतुन करणे योग्य . बाहेरुन जरी तुम्ही आंघोळ केली तरी आतुन विचारांनी समृध्द होणे गरजेचे. आतुन मनाची शुध्दी करणे गरजेचे आहे. मनाच्या समृध्द विचारांनी केलेली कृती कल्याणकारी असते.
बोध :- मनाची शुध्दी ही वरवर नसुन आतुन करावी लागते
Leave a Reply