मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले
दाटले उमाळे भाव निःशब्द गहिरे
साचले अश्रू खोल गहिऱ्या जाणिवांचे
डोळ्यांत अश्रुंचे ओंथबले पाट कित्येक ओले
काहूर मन कितीक कढ अंतरी मिटवले
वणवा पेटतो वनी पानांचे हिरवेपण जळते
मेलेल्या भावनेत नवं संजीवनी न येते
पसरुनी वणव्यात दाह करपून होरपळे
न फुलतो वसंत बहरात कधी कुठे
न पाने फुले मोहरुन न पुन्हा उमले
फुलांचे न दुःख कुणास कधी कळे
गंध फुलांचा उडता फुलं एकाकी रडे
आनंदाच्या झुल्यावर कळ्यांचे मोहक झुले
सुखात बरसे सर सारी दुःखाचे भाव वेडे न कळे
शब्दांचे भाव भावनांचे मन मनाचे बोल न कळे
वाऱ्यावर विरले बंध सोनेरी मनाचे तळ कोरडे
फसव्या क्षणांचा मोह होता हळवा जीव व्याकुळे
जीवनाचे बहरणे आनंदी सभोवती कुणाला काटे मिळे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply