दगडात देव, माणसात भेटला
नाशवंत देह, आत्मा कुणी पाहिला —(!)
सत्कर्म जगतचं राहते
तस्विरी टांगल्या भिंतीवर
नर्क काय अन स्वर्ग काय?
ठायी माणूस भूलोकी
आस वैकुंठाची
गिनती कशाला पाप पुण्याची
आयुष्य पुरे कर्माचे भोग भोगायला
दोर तुटता आयुष्याची
तडपला आत्मा, देहा वाचुनी
दगडात देव, माणसात भेटला
आत्मा अमर, देह मातीत मिसळला —(!!)
वारीत शोधती हरी
सावळ्या विठू -रुक्मिणी परी
आई बाप घरी
पंढरीचा पांडुरंग, चंद्रभागी तीरी
राहुटी राहूळी
कधी बांधावर पाहिला
भजनात ऐकला
कणाकणात वसला
भगवी पताका खांद्यावर
वारीचा वारकरी दिसला
दगडात देव, माणसात भेटला
देही मानवी, देवपण अवतरला —(!!!)
Leave a Reply