जीवनामध्ये जेंव्हा जेंव्हा
कधीही विश्रांतीसाठी…
थोडसं हळूच पहुडावं…!
एकांतात डोळे मिटावेट….
अन फक्त तूच दिसावीस….!
असं सततच घडत असतं…
प्रितीत अनावर ओढ़ असते…!
हेच मात्र खरं ….!!
तू जरी असलीस दूरदूर…!
तरीही तुझा स्पर्शभास जाणवतो …
मनांतरांची मुक्तमुग्ध भेट होते ….!
खरच किति विलक्षण असते निर्मल सत्यप्रितीची ओढ…
अनाहत , अलवार , ध्यास, भास, मानसस्पर्श , भावनां ….!!
दयाघनांन या संवेदना दिल्या आहेत हे खरं ….!!
पण जर या प्रीतमनभावनांबरोबरच…!
सत्यस्पर्शभासाचे वरदान दिले असते तर …?
हा प्रीत दुरावा कधीच जाणवला नसता ….!
जरी कुठेही असलो आपण तरी एकत्रच असतो …..!
पण या साऱ्याच मनासक्तीच्या कल्पना आहेत..!
या साऱ्या क्षणांवर फक्त एक अनामिकाची अदृष्य सत्ता आहे..!!
आणि केवळ त्या दयाघनाची आहे..!!!
पण आपण इदं न मम असे म्हणत ,
सत्कर्माचे संचित रचता रचता
केवळ त्याच अनामीकला भजत रहावे एवढेच आपल्या हातात आहे…!!!
हे मात्र खरं…!!!!
©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
रचना क्र. ६० (मुक्तरचना)
दिनांक ३-४-२०२१
?9766544908
Leave a Reply