लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो
काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो
लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी
दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो
जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो
रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती
सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच
याच सुखाच्या सपनात मी रमून जात होतो
दिस भराभर निघून उपाशीच घालवत होतो
कर्जाचा सावकार रोज उंबरठ्यावर पायत होतो
आज देतो उद्या देतो पैसा देऊ तरी कुठून
आजचा दिवस फक्त उद्यावर टाकत होतो
जगाच्या नजरीतला काय त मग मी पोशिंदाच होतो
मायाच लेकरासाठी मी जवारी उधार मागत होतो
पैश्यापायी मले कोणी दे ना जवरी
आसवे पुसत मी माणसातला माणूस शोधत होतो
— अॅड विशाखा समाधान बोरकर
. रा पातूर जी अकोला