आज सकाळी जरा आळसच आला. उशीरा उठले आणि आतल्या आवाजाने आपला विचार मांडला, ” जरा आयता चहा मिळाला असता तर बरे झाले असते. ” तेवढ्यात आमच्या स्वयंपाकीण बाईने आवाज देउन सांगितले, ” भाभी, चाय पिना है, चाय तैयार है |” हे ऐकताच मनात हास्यानंदाचे फटाके फुटत होते. असे होते ना कधी कधी आपण एखादी इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा पुर्ण होते. आपली इच्छा पुर्ण होते याला कारणे दोन आहेत असे मला वाटते एक म्हणजे युनिव्हर्स चा Law of attraction नियम आणि दुसरे म्हणजे आपल्या मनातल्या आवाजाची शक्ती.
मनातल्या आवाजाची शक्ती ही नकारात्मक पण असु शकते आणि सकारात्मक पण किंवा या दोन्हीच्या पलीकडील पण असु शकते. जशी माझी इच्छा होती, आयता चहा मिळावा आता ही नकारात्मक पण नाहीये आणि सकारात्मक पण नाही. ही मनातील शक्ती कशी वाढवावी. काही नाही फक्त सकारात्मक राहायचे. चांगला विचार करायचा. काही घटना अश्या असतात ज्या आपल्या हातात नसतात. पण त्यात स्वत:ला गुरफटून न टाकता उलट स्वत:ला त्यातून बाहेर काढायचे, स्वत:वर विश्वास ठेवायचा, आणि देवावर श्रद्धा ठेवायची. देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. आणि खूप महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टीने विचार करायचा. कारण आपण जसा विचार करतो तशी कमांड आपला मेंदू पूर्ण अवयवांना देत असतो. परिणामी आपल्या शरीरातील अवयव तसेच कार्य करतात. आणि त्यामुळे आपल्या शरीरातील मनातील भाव बदलतात आणि आपल्याला आपल्या आसपासचे वातावरण ही तसेच दिसु लागते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, मनातील भाव बदलतील परिणामी शरीरही सुद्रुढ राहील आणि सगळेच छान होईल.
पियुषा खरे- केळकर
Leave a Reply