श्री गुरुदेव दत्त!
मानव जन्म पूर्व प्रारब्धाने प्राप्त होतो.जन्म घेतानाच त्याची कुंडली तयार असते. त्याच्या आयुष्य तीन प्रकारच्या संबंधाने बांधलेले असतात.
एक जन्मजात संबंध! त्यात आई,वडील,भाऊ,बहीण,काका,काकी,मामा मामी,आत्या मावशी नवरा मुलगा मुलगी सून सासरे ह्या सारखे नातेवाईक संबंध…. जन्म संपला संबंध संपला.
दुसरा संबंध प्रस्थापित संबंध मित्र मैत्रिणी,सह प्रवासी,कामाच्या निमित्ताने एकत्रित आलेले हे काही काळा पुरते जवळ येतात आणि सोडून जातात.
तिसरा संबंध संत सनातन संबंध. जन्माच्या अगोदर होता आत्ता आहे आपल्या जन्मा नंतर ही राहणार आहे.आत्मा ज्या ज्या योनीत आहे ती चिरंजीव आहे. तो सबंध आत्मानंद देऊन जातो. त्याची भेट होण्यासाठी त्यात विलीन होण्यासाठी हा मानव जन्म आहे. ह्याचे आकलन होण्यासाठी सत्संग हवा! जे सत आहे त्याची जाणीव करून देतो त्यामुळे मानव जन्म सार्थकी लागतो.
हे सुद्धा पूर्व सुकृत आहे.हे सहजासहजी प्राप्त होत नाही. कारण जन्माच्या वेळी त्या अघटित शक्तीने आपल्या सोबत सहा षडरिपुना पाठवले आहे.
काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर! ह्या पैकी कोणता षडरिपू मानवाची बुद्धी भ्रष्ट्र करील हे सांगता येत नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे काम ज्याच्यामूळे आपला जन्म झालाय. मग क्रोध आहेच त्या जोडीला! सगळे कसे एकत्र असतात कोणीही कोणाची साथ सोडत नाहीत आणि इथेच सुरू होतो मानसिक त्रास!
हा त्रास शेवटच्या घडी पर्यंत सोबत असतो तो कुणालाच चुकलेला नाही. ह्या सर्वांवर भगवंताने एक उपाय सांगितला आहे माझी अनेक रूपे आहेत तेथे अनन्य भावाने शरण जा, माझे भक्ती भावाने नाम घे तुला परमानंद प्राप्त होहिल तुझा प्रारब्ध संपणार नाही पण त्या प्रारब्धाला सामोरे जायची ताकत नक्की मिळेल!
अध्यात्म प्रारब्ध संपवून घालवण्यासाठी नाही भोग भोगून घालवण्यासाठी आहे आणि त्यासाठीच अनेक उपाय आहेत जप जाप्य, पोथी वाचन,तीर्थ यात्रा,कथा श्रवण इत्यादी. ह्यातील कोणत्याही मार्गाने वाटचाल कराल तर नक्कीच मोक्ष जो काही म्हणतात तो मिळेल. मोक्ष मिळेल की नाही हे माहीत नाही पण समाधान नक्कीच मिळेल ह्यात शंका नाही! सर्वात शेवटी जीवनात समाधान नसेल तर लाखो रुपयांची प्रॉपर्टी-गाडी-बांगला-मुले बाळे असून मन जर समाधानी नसेल तर सगळे फुकट! ह्यासाठी जे सत आहे त्याची कास धरा.
त्यासाठी स्वामी महाराज सांगून गेले कलियुगात कलीच्या त्रासापासून वाचायचे असेल तर तुम्ही तुमच्या आराध्य दैवताचे नाम घ्या! तुमचे आराध्य दैवत पदोपदी साथ देईल ह्याची ग्वाही स्वामी महाराजांनी दिली आहे! तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!
श्री स्वामी समर्थ!
श्री गुरुदेव दत्त!
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा।।
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूंनाथा कृपा करा!!!
— सद्गुरू चरणरज पाध्येकाका
Leave a Reply