नवीन लेखन...

मानवता – अभंग

माणसाने द्यावे | प्रेम माणसाला |
हीच वाटे मला | मानवता ||१||

माणसाने आता | करावा आदर |
करावी कदर | माणसाची ||२ ||

ठेवू गड्या आता | कर्मावर श्रध्दा |
गाडू अंधश्रद्धा | पाताळात ||३||

जिवंत असता | करू रक्तदान |
शरिराचे दान | मेल्यावर ||४||

प्रत्येकाचे मन | आपण जपावे |
प्रत्येकाने द्यावे | योगदान ||५ ||

माणसे सगळी | एकची मानावी |
मूठमाती द्यावी | जातीभेदां ||६ ||

दृष्टीकोण ठेवा | व्यवहारवादी |
मानवतावादी | होवू आता ||७ ||

खावे ज्याचे त्याने | द्यावे भुकेल्याशी |
कोणीही उपाशी | राहू नये ||८ ||

निसर्गाची कृपा | लाभली अपार |
करू नको वार | झाडावर ||९ ||

प्राणिमात्रांवर | दया दाखवावी |
गाय ना विकावी | कसायाला ||१० ||

अपघाती जीव | दिसता रस्त्यात |
करण्या मदत | धाव घ्यावी ||११||

सांगितले काही | मानवता गुण |
करून वंदन | निसर्गाला ||१२ ||

© जयवंत भाऊराव वानखडे,कोरपना
तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५

Avatar
About Jaywant Bhaurao Wankhade 13 Articles
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..