लाख मोलाचे
आयुष्य आपुले,
कोटी जणांचे आधार.
अन्यायाविरुद्ध लढणारे सारे,
संघर्षमय जीवनसरोवर.
घडविले आहे आपण
जन जीवनाला …
देवूनी सुयोग्य आकार
वाढविले आहे आपुलकीने,
दीन-दुबळ्या बहुजनांना…
करुनी विषमतेचा प्रतिकार.
शिकविले आहे आपण,
निरक्षरतेलाही…!
ओतुनी जीव शाहीचा निर्विकार.
मिटविले आहेत
अंधाराचे दिवे…!
पेटवूनी सप्तरंगी इंद्रधनुविष्कार.
संघटीत केले आहे आपण,
विखुरलेल्या शक्तीहीन शक्तीसही…!
पेरुनी बीज एकतेचे महाअपरंपार.
फुलविले आहे आपण….
रानफुलानांही…!
जिरवुनी ओसाड मातीत महाज्ञानसागर.
लडविले आहेत, लढे
मानव मुक्तीसाठी…
घेवूनी तळहाती शिर.
काबीज केले आहेत, गड अनेक
राष्ट्र उभारणीसाठी….
खर्चुनी पोटचे प्राणप्रिय पोर.
रुजविले आहेत, आपण
स्वातंत्र्य, समता….
बंधुत्व, न्यायाचे धडे
चराचरात विश्वभर
पोसीले आहे आपण,
दु:खी कष्टी
निराधार मानवतेलाच…!
अखंडपणे आयुष्यभर.
– ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे (कवि, लेखक, संमिक्षक, संपादक, गीतकार)
☎️ मो.न.883 080 0335 ================================
Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ================================
Leave a Reply