इ.स.2019 पासून सर्व विरोधी पक्षांनी मंदी चा नारा लावला आहे, या वर्षीचे आकडे 2013 च्या पेक्षा चांगले आहेत तरी टीका होत आहे.
मंदी म्हणजे आर्थिक व्यवहार कमी होऊन liquidity कमी होणे हे मानले तर ऑटोमोबाईल मध्ये मंदी आहे आणि तिची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
1. भारतात शेतकरी हा वाहनांचा मुख्य ग्राहक आहे, शेतकऱ्यांना क्रॉप लोन मिळत असते, गेल्या1 वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, युपी इत्यादी राज्यात कर्जमाफी झाल्याने सर्व यंत्रणा त्यात व्यस्त आहे व नवी कर्ज देण्याचे प्रमाण कमी झाली
2.वाहन कर्ज देण्यात ICICI, HDFC, SBI या बँक अग्रेसर आहेत, गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीय नोकरदार वर्गात क्रेडिट कार्ड वापरायचे प्रमाण प्रचंड वाढले आणि हप्ते भरण्यास दिरंगाई झाल्याने सिबील स्कोअर कमी होत गेले, ज्या मूळे कार/बाईक लोन मिळणे अशक्य झाले, 2013 पर्यंत सिबील स्कोअर न बघता कर्ज दिले जात होते.
3.विजय मल्ल्या पासून, निरव मोदीपर्यंत अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आले आणि बँका नी कर्ज वाटपाची प्रक्रिया strict केली.
4. 2008 मध्ये होंडाचे प्रेसिडेंटनी स्टेटमेंट केले की 2020 पर्यंत दुचाकी ची विक्री 2 कोटी वाहने प्रति वर्ष होईल आणि त्यांनी 2 नवीन प्लांट टाकले, हाच कित्ता इतर कम्पन्यांनी गिरवला.
5.अशी विक्री वाढणार असेल तर तगडे बिक्री सेवा नेटवर्क पाहिजे म्हणून सर्व उत्पादकांनी भरमसाठ डीलर अपॉइंट केले.
6.डीलरची इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रचंड गुंतवणूक असते, त्यानंतर वर्किंग कॅपिटल व्याजआणि मॅनपॉवर यावर खूप खर्च होतो.
7.डीलर ने स्वतःच्या मनाप्रमाणे ऑर्डर पेमेंट केल्याने कम्पनीकडे स्टॉक वाढू लागले म्हणून 2010 पासून सर्व कंपन्यांनी डीलर ला इन्व्हेंटरी फंडिंग सक्तीचे केले.
8.इन्व्हेंटरी फंडिंग म्हणजे विनातारण कर्ज, हे फेडण्याची जबाबदारी डीलर ची आणि withdrawl पॉवर फक्त कंपनी कडे ! कंपन्यांनी पैसे withdraw केले व जे उत्पादन तयार आहे ते डीलर ला पाठवले.परिणामी डीलर नॉन मुविंगस्टोक मध्ये अडकत गेला.
9.2012 पासून भारतीय ग्राहकांचा कल सेडान कडून SUV कडे वळू लागला, 50% हुन अधिक मार्केट शेअर असणाऱ्या मारुती कडे कोणतीही SUV कार न्हवती जी लोकांना आवडेल.त्यामुळे मारुती वर मोठा परिणाम झाला, शेअर कोसळू लागला.
10.टू व्हीलर मध्ये येणारी BS6 व इलेक्टिक बाईक्स बद्दल स्पष्ट ज्ञान नसल्याने जुनी बाईकची विक्रीकिंमत खूप कमी झाली सुमारे 30%, त्यामुळे एक्सचेंज चे व्यवहार कमी झाले.
11.5 वर्षाचा विमा घेणे कॅम्पलसरी झाल्याने वाहनांची खरेदी करणे महाग झाले
12.बँकांत जसे घोटाळे उघडकीला येतील तसे इन्व्हेंटरी फंडिंग अवघड झाले, बँकांनी डीलर कडे 100% को लॅटरल सेक्युरिटी घेणं चालू केले जे 50 टक्क्यांहून अधिक डीलर ना शक्य न्हवतं परिणामी ही लिमिट बंद झाली आणि प्रायमरी सेल थंडावले. काही कंपन्यांच्या दबावामुळे एनफिल्ड (बुलेट)च्या सर्व डीलर चे कर्ज मागे घेतले गेले .
13.शेवरले चे प्रॉडक्ट भारतात लोकप्रिय न झाल्याने त्यांनी विक्री बंद केली परिणामी 116 डीलर बंद झाले त्यामुळे 15000 हुन जास्त नोकऱ्या गेल्या.
14.MG आणि Kia या कंपन्या भारतात आल्या आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, दोघांचे पुढील 1 वर्षाचे उत्पादन ऍडव्हान्स बुक झाले आहे, त्यामुळे वेटिंग लिस्ट वाढली आणि इतर कंपन्यांची विक्री थंडावली.
15.मारुती 3 ते 5 लाखाच्या अल्टो आणि vagon R बर अवलंबून राहिली बाजारात 5 लाखात SUV आल्याने कल तिकडे वळला.
16.या सर्व कारणांमुळे कम्पन्यांनी जे नवे डीलर अपॉइंट केले होते ते व जुने अडचणीत आले, अंतर्गत स्पर्धे मुळे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ लागले, त्यामुले एक वर्षात सुमारे 180 डीलर बंद झाले 25000 नोकऱ्या गेल्या..
17.मागणी, विक्री कमी झाल्याने उतपादन कमी झाले, त्यामुळे मारुती, होंडा यांनी पर्मनंट नसलेले कामगार कमी केले, याना पार्ट पुरवण्याऱ्या vendors व फौंद्री वर ही परिणाम झाला.
त्यामुळे ऑटो मध्ये नेहमी दिसणारी ग्रोथ दिसत नाही.
आता इलेक्ट्रिक वेहीकल चा मुद्दा स्पष्ट झालाय, येत्या सप्टेंबर पासून वाहन विक्री वाढेल आणि मार्च अखेर 2019-20 ची विक्री 2018-19 इतकी किंवा फक्त 7% कमी असेल.
खूप मोठ्या अपेक्षा सर्व उत्पादकांनी ठेवल्या होत्या, परिस्थितीने तो फुगा फुटला असून ऑटो इंडस्ट्री consolidation phase मध्ये आहे. Correction होऊन इंडस्ट्री याच वर्षी मूळ पदावर येईल.
हे एक प्रत्येक व्यवसाय त येणारे सायकल आहे, तात्पुरते आहे, त्याचा बाऊ करून विरोधक स्वतःची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करीत आहेत.
वरील सर्व मते माझ्या अभ्यासानुसार मांडली आहेत. माझ्याकडे या क्षेत्राचा 25 हुन अधिक वर्षाचा अनुभव आहे. मी अशी 4 सायकल पहिली आहेत.
हि मंदी चालू असतानाच, कोविड 19 ची भारतात सुरवात मार्च 2020 मध्ये झाली आणि हा व्यवसाय पुनः एकदा दोलायमान अवस्थेत झोके घेऊ लागला.
सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे.
कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील.
ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता.
व्यवसाय म्हणजे चढउतार आलेच. योग्य संधी शोधणे व पकडणे आलेच. मराठी माणूस व्यवसाय करायला, मोठी उडी घ्यायला घाबरतो असा समज प्रचलित आहे.
सर्वसाधारण पेट्रोल दुचाकींचा डीलरशीप घेणे म्हणजे 4-5 कोटींची गुंतवणूक अपरिहार्य आहे.
या क्षेत्रात जर मराठी उद्योजकांनी आता प्रवेश केला तर विद्युत वाहनांची डीलरशीप अवघ्या ₹ 25 लाखाच्या गुंतवणुकीत घेऊन, प्रचंड वेगाने वाढणाऱ्या उद्योगाचा यशस्वी भाग होऊ शकतात.
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
CEO
डेल्टा साकुरा मोटर कॉर्पोरेशन
Leave a Reply