जवळ जाता “मंगळ”यान
सगळ्यांचे लागले तिकडेच ध्यान,
“मंगळ” “अमंगळ” राहिला नसून,
“मंगळ” “मंगल” झाला आहे I
“अमंगल” “मंगळाशी” भारताने केली
“मंगळ”यान पाठवून युती,
“मंगळाची” आता न
कोणा राहिली तशी भीती I
“मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,
“मंगळास” “मंगलमय” केले आहे,
“अमंगल” “मंगळाचे”,
चांगलेच “मंगळ” झाले आहे,
थोड्याच दिवसात येत आहे,
सण मोठा दिपोस्तव,
“मंगळ”यांच्या यशकारी सफरीने,
घडतो आहे “मंगलोस्तव”
“मंगळ” “मंगल” “मंगलमय”
त्रिसूत्रीने केला “मंगळाचा” भाग्योदय
मयुर तोंडवळकर
— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर
Leave a Reply