(चाल : आरती साईबाबा)
जयदेवी मंगलमाता, मनोभावे पुजू आता,
महिन्यांचा श्रावण राजा, मंगळवारी करती पूजा
फळे फुले, नानापत्री, हळदी कुंकू नारळ खण,
धूप दिप उजळोनी ओवाळती निरांजन ।। जय……
सोळा घरच्या सोळा जणी, व्रत करती सुहासिनी
नानापरी नैवेद्याच्या, थाट असे उत्सवाचा,
झिम्मा फुगड्या, गोफविण, करती रात्री गाजरण ।। जय……
नाग आणि कलश दान, साडी चोळी सौख्यदान,
मायमाता तोषवोनी, लेक करी उद्यापन
अखंडित सौभाग्याचे मागतसे वरदान ।। जय……
Leave a Reply