नवीन लेखन...

मंगलाष्टक : वरमाला अर्पण, एक भावूक क्षण!

नवनवीन लग्नाचे बेत आखत असालच नाही का? लग्नाळू मंडळींचा चलतीचा काळ, वधुपरीक्षा, वराची चौकशी, सगळं कसं साग्रसंगीत व्हायला हवे, नाही?

हॉल, वधु वराची अंगठी, लग्नपत्रिका, केळवण, सजावट, बस्ता, साड्या, सूट, रुखवत, दागिने, आजेचीर, मावळणीची भेट, आहेर, नणंदेचा मानपान, कानपिळा, सासरकडच्यांचं, काय हवं नको, वाजंत्री, जेवणावळी, साऱ्यांचीच धावपळ उडालेली. एक ना दोन, असंख्य गोष्टी कराव्या लागतात.

लग्नाला भटजी हवेतच, लग्न आमच्या पद्धतीनेच होणार हं विहीणबाई! मुलीला कसं सालंकृत करून पाठवणार आम्ही, काही चिंता नको, आमच्यात असं नसतं काही, तर तसं असतं.

शेवटी लग्न कोणाचं आहे? आमचं घराणं किती मोठं इत्यादी परवलीची वाक्ये नेहमीच कानावरून जातात. पण हे सर्व अतिशय काळजीपूर्वक करताना लग्नविधीच्या महत्वाच्या संस्काराकडे आपण किती जागरूकतेने पाहतो, की लग्न एक इव्हेंट करून ठेवलाय आपण?

परवा विष्णुदास भावे नाट्यगृहात, श्रीधर फडके यांचा ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. श्रीधरजी आत्मीयतेने गात होते. गीत रामायणाचे गीतकार गदिमा आणि संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या शब्दांचे अर्थ, हरकती, ताना, शब्दांना संगीताचे कोंदण देताना बाबूजींनी जपलेले शब्दांचे सौंदर्य आणि त्यातील भावमाधुर्य ते श्रोत्यांना उकलून दाखवीत होते.

सीता स्वयंवराचे गीत गाताना त्यातील सुहास्य सलज्ज, सत्शील मुग्धता, उत्कटता, अधीरता, कुतूहल, या भावभावनांच्या आधारे सीतेचे भावविश्व उलगडून सांगत होते. सर्व श्रोतेगण ‘स्वयंवर झाले सीतेचे’ असा एकच गजर करीत भारलेले वातावरण प्रसन्न करीत होते.

अशावेळी एक विषय मनात डोकावून गेला. हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी विवाह संस्कार हा प्रधान संस्कार आहे. बाळलीलांचे अप्राप्य नवल ओसरल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी बालकाची मुंज करून त्या बटूला ब्रम्हचर्येची दीक्षा देत ज्ञानार्जनासाठी गुरुगृही गुरुकुलात धाडले जाई. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर उदरर्निर्वाहादि, अर्थार्जनाचे मार्ग प्रशस्त झाल्यावर गृहस्थाश्रमासाठी अनुरूप सुयोग्य वधूचा शोध घेतला जाई. स्त्री-पुरुष संबंधांना नैतिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी, श्वेतकेतूने विवाह संस्था सुरु केली.

विवाहाच्या निमंत्रण पत्रिका निरखल्या तर दोन स्वतंत्र जीवांचे मंगलमय मिलन घडविणारा सहजीवनाच्या वाटेवरचा एक मनमोहक भावविभोर क्षण असे नयनरम्य मनोहारी चित्र समोर तरळते. परस्पर संमतीने वधु-वराचा वाङनिश्चय केला जातो. तद्नंतर साखरपुडा, टिळा, विवाह संकल्प, सीमांतपूजन, मधुपर्क, गौरीहरपूजन, असे शास्त्रोक्त विधी होतात.

हळद लावणे हा महत्त्वाचा लग्नविधी वधु-वराच्या घरी वेगवेगळा अत्यंत मनोरंजक आणि आनंदी वातावरणात साजरा होतो. हळदीमुळे आरोग्यवर्धक, जंतुरोधक गुणांबरोबर सतेज त्वचा, तजेलदार कांती आणि उल्हसित, प्रसन्न मनें असा दुहेरी फायदा होतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..