मंगळसूत्राच्या काळ्या मण्यामध्ये
ती बांधली जाते संसार धाग्यामध्ये
सोन्याच्या वाट्या दोन चमचम करतात
गळ्यात तिच्या सोनेरी मणी चकाकतात
मंगळसूत्र असलं गळ्यात की
बाहेरच्या लांडग्याची नजर जास्त नसते
घरातल्या माणसांत मात्र तिची
ससेहोलपट कुठेतरी होत असते
असतो नवरा त्या वाटयाशी बांधलेला
प्रेम मात्र नसते संसार वाट्याला
ती रडते रुसते हरवते बावरते
पण कुणालाच कळत कधी नसते
तिच्या दुःखाच कोणाला देण घेण नसत
मंगळसूत्र मात्र तिच्या गळ्यात भरीव असतं
सासरचे सगळे दुरुन नवराही लांब असतो
तिच्या जवळ सुख दुःखात नवराही नसतो
संसार चालतो रोजच्या गडबडीत तो
मंगळसूत्राच्या पावित्र्यात तिचा भाव कोमेजतो
नवरा असतो हक्काचा नावं त्याच असतं
तिला मात्र मनातही सुखाच आंदण नसतं
ज्यांचे नवरे नसतात त्या अनेकजणी रडतात
आयुष्यात वारंवार दुःख कष्ट झेलतात
मान्य आहे नवरा नसल्याचं दुःख त्यांना असतं
जीवनात अनेकदा भोग येणं होतं असतं
नवरा असूनही बऱ्याचदा काहींना माया मिळत नसते
दुःख मात्र खूप जणींच्या नशिबी असते
असेच संसार चालतात रडून अनेक असेही
यांचं दुःख कळत नाही कुठेच कधी काही
आयुष्य सरत सगळं मंगळसूत्रासह
दुःख विरत जातं भयाण जीवघेण
विधवा दुःखी की अशा सधवा दुःखी
हेच कधी उमगत आयुष्यात नाही
खर सांगते सखींनो नवरा नसतो पण
असून नवरा ज्या दुःखी त्यांच आयुष्य भकास होतं
गळ्यात मंगळसूत्राचे लेबल हक्काने असतं
कितीतरी अश्या सख्या ज्यांचं जीवन झाकोळत
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply