मंजीष्ठाची अनेक फांद्या असलेली प्रसरणशील आरोहिणी वेल असते.ह्याचे काण्ड चौकोनी व गुलाबी लाल रंगाचे असते.पाने हृदयाकृती,टोकदार ५-१० सेंमी लांब व वरच्या भागात खरखरीत व मागील भाग मऊ व लव युक्त असतो.ह्याचा देठ पानांपेक्षा मोठा व दुप्पट लांब असतो.त्याच्यावर काट्यासारखे भाग असतात.चार पानांच्या चक्रातील २ पाने लहान व २ पाने मोठी असतात.फुल ०.३-२.५ सेंमी लांब मांसल गोलाकार काळे किंवा निळसर असते.
आता आपण मंजीष्ठाचे गुण पाहुयात.हि चवीला तुरट,कडू,गोड असून उष्ण व गुरू व रूक्ष असते.हि कफ,पित्त व वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)मंजीष्ठा कडू व तुरट तसेच रूक्ष असल्याने जखमा भरून काढते व त्यातील स्त्राव देखील कमी करते.
२)हि कडू,तुरट,गोड चवीची व रूक्ष असल्याने रक्ताचे प्रसादन व पोषण करते व त्यात विकृत पद्धतीने वाढलेल्या तीन्ही दोषांचे शमन व शोधन करून त्वचेचा वर्ण सुधारते.
३)कडू,तुरट चवीने मंजीष्ठा मांस व रक्तातील क्लेद,पित्त व विषाचे शोधन व शमन करते व त्वचारोग नष्ट करते.
४)उष्ण गुणाने मंजीष्ठा गर्भाशय उत्तेजक व शोधक कार्य करते म्हणून मासिक पाळीच्या तक्रारीत ती उपयुक्त आहे.
५)अतिसारामध्ये मंजीष्ठा चुर्ण व लोध्र चुर्ण एकत्र मधासोबत देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply