मन कुठे असत, कस ते दिसत
कधी कळलच नाही कुणा,
मात्र पावलोपावली जाणवतात,
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा !
मन इतक मोठ,
कि आभाळ त्यात माईना,
मनाच्या गाभार्यांत
अगणित भावना !
कडू-गोड आठवणींचा,
मन एक खजिना,
भावनांच्या प्रतिमेचा
तो सुंदर आईना !
चिंता-भिती-संशयाचा
मनी सतत पिंगा
भल्याबुर्या विचारांचा
तिथे भारी दंगा !
मन जस कांही
एखाद हटवादी पोर
हटकायला जाव तर
होत बंडखोर !
पण मन म्हणजे ईश्वर
मन म्हणजे मैतर
मन म्हणजे गुरु
मनांतल्या मनांत सार्यांना स्मरु !
— सौ.अलका वढावकर
Leave a Reply