नवीन लेखन...

मन कि बात – भ्रमर

लेखाचं नांव भ्रमर असलं, तरी भ्रमर किंवा भुंगा याच्यावर यात फार काही लिहीलेलं नाही. मला सांगायचंय ते ‘भ्रमर’वृत्तीविषयी आणि ती पुरूषाशी संबंधीत समजली जाते. लेखाला ‘पुरूष’ असं नांव दिलं असतं, तर ते बटबटीत झालं असतं म्हणून ‘भ्रमर’ म्हटलं येवढंच..!!

पुरूष हा जोडीदाराशी वफादार किंवा एकनिष्ठ नसतो असं समजलं जातं आणि ते शत-प्रतिशत खरंही आहे. कुणाही स्त्रीबद्दल निदान मनातल्या मनात तरी, जो चळत नाही तो पुरूषच नव्हे. प्रत्येकाची बाहेर ‘प्रकरणं’ करायची क्षमता किंवा डेअरींग असतेच असं नव्हे. सर्व पुरूषांना असं करावसं वाटत असतं, पण काहींना धाडस नसतं तर काहीना संधी मिळत नाही, आणि मग अशी प्रकरणं मनातल्या मनात केली जातात, वरकरणी साळसुदपणाचा भाव आणून. मनात वाईट येणं हे प्रत्यक्षात पाप करण्यापेक्षा वाईट अशी आपली संस्कृतीच सांगते. ‘आमचे हे तसे नाहीत’ असा जर कुणा आर्यस्त्रीचा समज असेल तर तो गैरसमज आहे असं खुशाल समजावं.

पुरूष असा का वागतो हा मुख्य मुद्दा. याचं उत्तर शोधायचं तर ते फार अवघड नाही. जगाच्या निर्मात्याने दोन जाती बनवल्या. नर व मादी. सर्वच सजीवांमध्ये नर-मादी असतात. क्वचित काही उभयलिंगी असतात, पण तो अपवाद. निसर्गाने नर-मादी अशा दोनच जाती निर्माण का केल्या याचं उत्तर नीट समजून घेतलं, तर पुरूषाच्या भ्रमरवृत्तीच्या गणिताचं उत्तर मिळणं अवघड नाही. नीट समजून याचा अर्थ, असं भिन्न लिंगत्व का निर्माण झालं हे सर्वांनाच माहीत असतं, परंतू प्रत्यक्ष जीवनात आपण ते लागू करून पाहात नाही, म्हणून नीट समजून घेणं आवश्य आहे असं मी म्हणतो.

निसर्गाला वंशसातत्य अपेक्षित असल्याने त्याने दोन जाती निर्माण केल्या. मग वंशसातत्याचा आणि पुरूषाच्या भ्रमरवृत्तीचा संबंध काय असा पुढचा प्रश्न मनात उभा राहाणं अगदी सहाजिक आहे. माझ्याही मनात असा प्रश्न उभा राहीला व मी माझ्या परीने त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला व मला सापडलेलं उत्तर तुमच्यासमोर ठेवतो.

समजा एका पुरूषाचा एका स्त्रीशी संबंधं आला, तर नियत वेळात त्या स्त्रीला एका वेळेस एकच अपत्य होऊ शकतं( जुळ-तीळं अथवा जास्त हे अपवाद समजावेत.). आता त्याच स्त्रीचा एका वेळेस एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध आला, तरी पुन्हा अपत्यसंभव एका नियत वेळेत एकच राहातो. म्हणजे स्त्रीची अपत्यास जन्म देणाची क्षमता, कितीही पुरूषांशी संबंधं आला तरी, एका वेळेस एक येवढीच राहाते.

आता हेच उलटं झालं तर? एका पुरूषाचा एका वेळेस अनेक, समजा दहा, स्त्रीयांचा संबंध आला, तर एका वेळेस एका स्त्रीवा एक, या प्रमाणे त्या एकाच वेळेस त्या दहा स्त्रीयांपासून दहा अपत्यांची यप्राप्ती शक्य असते. निसर्गाला वंश सातत्य अपेक्षित असतं ते हेच.

स्त्रीची जननक्षमता लक्षात घेऊन जगातील सर्वच समाजात तिला ‘भुमी’ची उपमा दिलीय. ‘माती’, ‘मादी’, ‘माता’ या शब्दांतील साधर्म्य हेच सांगते. पुरूषाला ‘ढगां’ची उपमा दिलीय. ढग विहरत असतो, विहरता विहरता पाऊस पाडणे त्या त्या ठिकाणची ‘भुमी’ प्रसवण्याचं निसर्गाने नेमून दिलेलं कार्य करणे हेच ढगांकडून अपेक्षित असतं. तो जेवढ्या भुमींवर बरसेल, तेवढी ती ती भुमी प्रसवेल हा निसर्ग नियम आहे.

कालीदासाच्या ‘मेघदूता’चा मी अभ्यास केला नसला तरी हे महाकाव्य हाच संदेश देतं असं मला राहून राहून वाटतं. मेघदूताचा नायक (यक्ष), त्याच्या रामगिरी पर्वतावरील शिक्षेच्या काळात आलेल्या वर्षाऋतूत अलका नगरीत राहाणाऱ्या आपल्या पत्नीला ‘मेघा’मार्फत संदेश धाडतो व रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्‍या मार्गाचे रसभरित वर्णन करून पत्नीचे शुभवर्तमान पुन्हा त्याला येऊन देण्याचे सांगून तो यक्ष मेघाची अलका नगरीकडे रवानगी करतो असं काहीसं हे काव्य. मी याचा अभ्यास केलेला नसला तरी साधारण असाच त्याचा सारांश आहे. यक्षाच्या पत्नीकडे जाता जाता वाटेतील भुमीचे वर्णन करण्यामागे ती भुमी प्रसवत जा असंच तो यक्ष ढगाला सुचवत असतो असं मला वाटतं.या महाकाव्यातील पती, पत्नी ही पात्र आणि ढग, वर्षाऋतू, वाटेतील भुमीचं वर्णन असं नेपथ्य उगाचच केलेलं नाही. ‘मेघदुत’ हे महानाट्य आहे असं मी समजतो व नाटकातील ‘प्राॅपर्टी’ न पात्रांची नाटककाराने केलेली योजना निश्चित अशा हेतूने केलेली असते व त्या सर्वांचा काही ना काही उपयोग होत असतो. उगाच सुंदर दिसावं म्हणून नाटकात काहीच नसतं. नाटक हे जीवनाचं प्रतिबिंब आहे हे लक्षात घेतलं तर, हे महाकाव्य मला तरी वंशसातत्याचा संदेश देतं असंच वाटतं.

पुरूषांच्या भ्रमरवृत्तीच्या मागे अशीच भूमी-मेघाची नैसर्गिक प्रेरणा असते. बाकी विवाह, सामाजिक नियम संकेत वैगेरे गोष्टी मानव निर्मित म्हणजे कृत्रीम आहेत. सामाजिक आरोग्य सुदृढ राहावे हासाठी हे नियम समाजाने बनवलेले असतात. असे नियम समाजाप्रमाणे व काळाप्रमाणेही सातत्यमे बदलत असतात. मनुष्य हा प्राणी आहे व तो प्राण्यांची नैसर्गिक प्रेरणा सामाजिक नियमांवर मात करून ती चौकट तोडायला मनुष्याला, इथं पुरुषाला, तसं वागायला भाग पाडत असते. म्हणून तर समाजात आपल्याला विवाहबाह्य अशी अनेक छुपी-उघड प्रकरणं बघायला मिळत असतात. समाजाच्या दृष्टीने ते अमैतिक असलं तरी निसर्गाच्या दृष्टीनं नैतिकच म्हटलं पाहीजे.

समाजातील निती नियम, संकेत यांचा शोध शेतीच्या शोधानंतर लागला. शेतीच्या शोधामुळे भटका माणूस स्थिर झाला व ‘प्राॅपर्टी’ ही कल्पना मनुष्याच्या जगात आली व तिथंच कुटुंबं स्स्था निर्माण झाली. संतती निर्मितीत पुरुषाचाही सहभाग असतो हे लक्षात आल्यानंतर मालकी, वारस या कल्पना जन्माला आल्या आणि कुटुंबं संस्था आणखी बळकट झाली आणि मग समाजाने पुरुषप्रधान नियम बनवायला सुरुवात केली. हे नियम कालपरत्वे बदलत गेले असले तरी ‘गर्भाशया’ची मालकी हा हेतू मात्र कायम राहीला. आपला वंश सातत्याने कसा वाढता राहील याची नकळतची प्रेरणा पुरूषात असते व त्यातूनच बहुपत्नीत्व साकारलं.

इस्लाम धर्मात चार बायका करण्याची मुभा आहे, यामागे संतती वृद्धी हेच कारण आहे. ज्या अरबस्थानात हा धर्म जन्मला, तो आजही टोळीवाल्यांचा देश आहे व त्या टोळ्यांमधे आपापसात व धर्मप्रसारासाठी इतर देशांतही सतत युद्ध (सध्या याला आतंकवाद असं म्हणतात) सुरू असायची, आजही असतात. या युद्धात पुरुष जातीची प्राणहानी होणं ओघानेच आलं व ती भरून काढण्यासाठी मनुष्यबळाचा सतत पुरवठा करण्याचं काम बहुपत्नीत्व करतं. आता त्याची आवश्यकता नसली तरी प्रथा सुरूच आहे.

पुरुष म्हणूनच सतत एका ‘गर्भाषया’च्या शोधात असतो म्हणून तो जी निखळ मैत्री वैगेरे म्हणत असला तरी त्याची नैसर्गिक इच्छा समागम हीच असते. समागम म्हणजे तरी दुसरं काय, तर गर्भाशयात आपला वंश स्थापन करणं. तेवढं झालं की तो लगेच दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या शोधात निघतो. पुरूष मरेपर्यंत जननक्षम असतो तर स्त्री वयाच्या एका ठराविक मर्यादेपर्यंतच ह्याचं कारणही निसर्गाला अपेक्षित असलेलं वंश सातत्य हेच. संस्कार, समाज या गोष्टी तो शक्य तेवढ्या पाळतो पण संधी मिळाली की तोडतोही. पुरूषाच्या या वृत्तीला भ्रमराची उपमा दिली आहे. भ्रमराचं निसर्गातलं कार्य परागीकरण हेच आहे हे विज्ञानाच्या पुस्तकांत शालेय जीवनात आपण शिकलो. पुरुषाकडून निसर्गाला हेच अपेक्षित आहे व म्हणून पुरूष हा ‘भ्रमर’ आहे असं म्हटलं जातं. ‘गुण गुणा रहे है भंवरे, खिल रही है कली कली’ हे नितातं सुंदर गाणं तरी वेगळं काय सांगतं..!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..