|| हरी ॐ ||
वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान,
त्याचे नाही कधी चुकले भान!
या वर्षी येताना मनात शंका नाना,
आनंदाने स्वागत होईल ना?
शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण,
पीक गेले हातचे शेत झाले वैराण!
माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात,
आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!
वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या,
नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!
पल्लवल्या आशा मराठवाडा-विदर्भकरांच्या,
आला जीवात जीव थोडा सगळ्यांच्या!
आनंदाने नाचली माझी पोरं,
नद्या नाल्यांना आला मोठा पूर!
दीड दिवसाने आला दिवस पुनर्मिलाप
काहींचा नदी तलाव समुद्रात
काही कागदाच्या लागद्यांचे
घरच्याघरी आरामात!
पुनर्मिलापा दिवशी समुद्रावर जमले माझे भाऊबंध
आरतीत कोणाचेच नव्हते लक्ष!
आता आपले विसर्जन प्रदूषणयुक्त समुद्रात,
दुसरे ठिकाण नाही लक्षात आले वाटतं?
सुख दु:खाच्या गप्पागोष्टी जोरात,
एक म्हणाला मला आकारतांना पीओपी वापरतात !
किती आग होते माझ्या शरीराची
एवढे कमी म्हणून रासायनिक रंगाने रंगवतात !
एक दुसऱ्याला म्हणाला
त्याला आकारतांना मऊ कागदाचा लगदा
गोंद व्हायटिंग पावडर
आणि नैसर्गिक रंगांचा वापर !
शाडूचा म्हणाला हल्ली मला जास्त मागणी,
पण माती आता मिळणे कठीण, रंग झाले महाग,
वजनानेही मी जास्त वजनदार,
त्यामुळे वाढला कागदाच्या लगद्याचा डिमांड !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply