भारताचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर प्रभु पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ,स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली.
आय.आय.टी.ची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. सुरुवातीला किमान १० वर्षे ते राजकारणात येण्यासाठी धडपडत होते. ते काही निवडणुका हरले व त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती; परंतु पर्रीकरांना काँग्रेसनेच आपली अकार्यक्षमता व भ्रष्टाचार यामुळे आयती संधी प्राप्त करून दिली. १९९४ मध्ये लोक काँग्रेस पक्षाला कंटाळले होते व देशात हिंदुत्वाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. पर्रीकर संघातून आले होते आणि संघाबद्दल जनमानसात एक चांगली प्रतिमा होती; परंतु बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे नेत्यामध्ये अभावानेच दिसणारे गुण पर्रीकरांकडे आहेत. गोव्यात त्यांनी अर्थसंकल्प मांडले ते कल्पक आणि जनतेला चकित, खुश करणारे होते. त्यांनी विकासकामेही भरपूर केली. या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतही त्यांनी पूल आणि हमरस्त्याची कामे केंद्रीय मदतीने करून विकासाचा धडाका लावला, हे कोणाला नाकारता येणार नाही.
मनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांच्या मालमत्तेत अगदीच मामुली याढ झाली असल्याचे सांगितले जाते. इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला होता तो आता त्यांचा मुलगा सांभाळतो.
वास्तविक २००९ सालीच पर्रिकर केंद्रीय राजकारणात सक्रीय झाले असते. तेव्हाच त्यंच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा दिली जाणार होती मात्र एका मुलाखतीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांच्याबाबत त्यांनी कांही टिपण्णी केल्याने त्यांची ही संधी हुकली असे समजते. संरक्षण मंत्रालयासाठी कडक शिस्तीचा, त्वरीत निर्णय घेणारा आणि प्रामाणिक मंत्री असणे महत्त्वाचे मानले जाते आणि पर्रिकर या साऱ्या कसोट्या पार करणारे मंत्री ठरतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी संरक्षणमंत्री पदाची शपथ घेतली.
मनोहर पर्रिकर हे सध्या गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. यावर त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. मंगला खाडीलकर यांनी मनोहर पर्रिकर यांच्या वर ‘एक मनोहर कथा’ हे पुस्तक लिहिले आहे. मनोहर पर्रीकर यांनी उच्चारलेले शब्द, उभे केलेले कार्य, जपलेले मैत्र, दुरावे, सोबतीने घालविलेले क्षण, हर्ष-विमर्षाचे कल्लोळ यांची स्पंदने टिपण्याचा प्रयत्न ‘एक मनोहर कथा’ या पुस्तकात त्यांनी केला आहे.
मनोहर पर्रिकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी निधन झाले.
गोव्याने इतके मुख्यमंत्री पाहिले; परंतु राजकारणात संपूर्णत: बुडून गेलेला आणि रात्रंदिवस राजकारणाशिवाय दुसरा विचार न करणारा मुख्यमंत्री दुसरा नाही.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply