मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले.
त्यांचा जन्म ८ मार्च १९३१ रोजी झाला.त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.
१९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सितारों से आगे’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार एस. डी. बर्मन यांनी मनोहारी सिंग यांना संधी दिली. ‘सट्टा बाजार’ चित्रपटातील ‘तुम्हे याद होगा’ या गाण्यातील त्यांचे सॅक्सोफोनवादन लोकप्रिय झाले होते. ‘सबसे बडा रुपैया’ आणि ‘चटपटी’ या दोन चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणूनही ते काम पाहत होते.
शालिमार चित्रपटातील ‘हम बेवफा हरगीज न थे’, दाग चित्रपटातील ‘मेरे दिल मे आज क्या है’, मेरा साया चित्रपटातील ‘तू जहॉं जहॉं चलेगा मेरा साया’, कटी पतंगमधील ‘ये शाम मस्तानी’, मेरे जीवन साथीमधील ‘ओ, मेरे दिल के चैन’, शोरमधील ‘एक प्यार का नगमा है’ तसेच ‘दर्या किनारे एक बंगला ग पोरी’ अशा शेकडो गाण्यांना त्यांनी सॅक्सो फोनच्या सूरांचा साज चढविला. त्यामुळे त्या गाण्यांची लोकप्रियता वाढली.
शंकर-जयकिशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत-पॅरेलाल आदी नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा नेपाळ सरकारने गौरव केला होता. मनोहारी सिंग यांचा ‘सॅक्स अपील’ नावाचा अल्बमही प्रकाशित झाला होता.
मनोहारी सिंग यांचे १३ जुलै २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply