भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचा जन्म २२ एप्रिल १९६० रोजी झाला.
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी लष्करात ४० वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. नरवणे यांनी देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी काम केले आहे.३० एप्रिल २०२२ रोजी ते निवृत्त होत आहेत. नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून जून १९८० मध्ये शीख लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधून लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी सैन्यात पाऊल ठेवलं. काश्मीर आणि ईशान्य भारतात कट्टरतावाद्यांविरोधातील मोहिमांचा मोठा अनुभव आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये काश्मीर आणि कट्टरतावाद्यांच्या मुद्द्यांवरून तणावाचं वातावरण असताना लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली होती. जम्मू-काश्मीरमध्ये एका राष्ट्रीय रायफल्स बटालियनचं नेतृत्व नरवणेंनी केलं होतं. शिवाय, मेजर जनरल म्हणून नरवणे आसाम रायफल्सचे ते इन्स्पेक्टर जनरलही होते. दिल्लीत नियुक्ती होण्याआधी नरवणे कोलकात्यामध्ये पूर्व विभागाचे प्रमुख होते. भारत-चीनमधील चार हजार किलोमीटर सीमेची भारताकडून देखभाल हे विभाग करतं. शिवाय, पूर्व सीमेवरील सरावामागची कल्पना नरवणे यांचीच होती. दिल्ली एरिया जनरल ऑफिसर म्हणूनही लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी काम पाहिलंय. ऑपरेशन ‘पवन’वेळी श्रीलंकेत पार पडलेल्या इंडियन पीस कीपिंग फोर्समध्येही नरवणे सहभागी होते. तसेच, म्यानमार दूतावासात तीन वर्षे नरवणेंनी काम केलंय.
जम्मू-काश्मीरमधील बटालियनचं नेतृत्व केल्याबद्दल – सेना पदक, आसाम रायफल्सचे महानिरीक्षक (उत्तर) म्हणून नागालँडमधील सेवेसाठी – विशिष्ट सेवा पदक, स्ट्राईक कॉर्प्सचं नेतृत्त्व केल्याबद्दल – अतिविशिष्ट सेवा पदक, आर्मी ट्रेनिंग कमांडमध्ये GOC-in-C म्हणून सेवा केल्याबद्दल – परम विशिष्ट सेवा पदक अशी लेफ्टनंट जनरल नरवणेंना पदके मिळाली आहेत.नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. खडतर लष्करी सेवेत रमलेल्या नरवणे यांना बागकामाचीदेखील आवड आहे. लष्करी हद्दीत उद्यान, वाहतूक बेटांच्या सौंदर्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते.
योगासने हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग. लष्करी सेवेत त्यांनी ही आवड जोपासली. नरवणे यांचे वडील मुकुंद हे हवाई दलात अधिकारी होते. त्यांच्या आई सुधा नरवणे या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. मनोज नरवणे यांच्या पत्नी शिक्षिका आहेत. मनोज यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. नरवणे दाम्पत्याला दोन मुली आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply