माणसाचे व सुगंधाचे एक अतूट नाते असावे
त्याच्याच जीवनगाणे खुशाल असावे ।।धृ।।
सुगंध….
माणसाला हवाहवासा वाटणारा
आपल्याच मस्तीत वावरणारा
घ्यावा तितका कमीच वाटणारा
एकांतातही आसपास दरवळणारा
सुगंध….
आयुष्याच्या वाटेवरील सुख-दुःखाचा झरा
मोर-लांडोरीच्या बेधुंद नर्तकीचा पिसारा
फुलांच्या कोमल त्वचेच्या आठवणी जपविणारा
निसर्ग आणि नात्यांची मखमली वाढविणारा
सुगंध….
माणसाचे मन सैरावैरा पळविणारा
निसर्गाशी बांधून ठेवणारा
दुखणी विसरायला लावणारा
जीवन जगायला शिकविणारा
सुगंध….
पक्ष्यांचे अमृत स्वर सुगंधित करणारा
शब्दाविना जुन्या आठवणींना उजाळा देणारा
तरुण प्रेमाच्या आठवणी ताज्या करणारा
घराला स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा
परंतु….
आजच्या धावपळीच्या जगात
सिमेंट जंगलांच्या प्रदूषणात
सुगंध कुठे लपून बसला देव जाणे
शिल्लक राहिले फक्त जीवघेणी जगणे
नक्षीदार बाटलीत कोंडलेला
अन् क्षणिक टिकणारा सुगंध घेणे
अगदी दुभंगलेल्या नात्याप्रमाणे
म्हणूनच….
माणूस आनंदाने सुगंधी होत नाही
अन् सुगंधी आयुष्य जगत नाही
तेव्हा कळेल त्याला….
माणसाचे व सुगंधाचे एक अतूट नाते असावे
त्याच्याच मस्तीत जीवनगाणे खुशाल असावे ।।धृ।।
Leave a Reply