कविता! म्हणजे जगणेच असते
मनाचेच बिलोरी प्रतिबिंब असते
मनभावनांना, मुक्त व्यक्त करुनी
जाणीवांना शब्दात माळणे असते
अलवार, अंतरात झुळझुळणारी
आत्मरंगी! निर्मल सरिता असते
मांगल्यमयी, ओढ प्रीतसागराची
भावशब्दी, पावन गंगोत्री असते
अविस्मरणीय, आठवांचीच गाथा
पाझरणारी तृप्त आत्मशांती असते
मनामनांचे, हितगुज भावस्पर्शी
शब्दभावनांचीच रिमझिम असते
शब्द शब्द! वरदान ते भगवंताचे
क्षणात, वेचुनी अर्पावयाचे असते
शब्दा,शब्दात, भाव सत्यप्रीतीचे
कवीतेत, त्या विरघळायचे असते
भावशब्दी! लडिवाळ स्पर्श रेशमी
सात्विक! आनंदघनी भरते असते
कविताच, सर्वश्रेष्ठ साहित्य संपदा
ब्रह्माण्ड! शब्दांच्याच कवेत असते
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ५७.
२४ – २ – २०२२.
Leave a Reply