कुणीच कुणाच्या जवळ नाही,
हीच खरी समस्या आहे,
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी,
आणि अमावस्या जास्त आहे .
हल्ली माणसं पहिल्या सारखं,
दुःख कुणाला सांगत नाहीत,
मनाचा कोंडमारा होतोय,
म्हणून आनंदी दिसत नाहीत .
एवढंच काय,एका छता खाली राहणारी तरी ,
माणसं जवळ राहिलीत का ?,
हसत खेळत गप्पा मारणारी ,
कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?
अपवाद म्हणून असतील काही,
पण प्रमाण खूप कमी झालंय,
पैश्याच्या मागे धावता धावता,
दुःख खूप वाट्याला आलंय.
नातेवाईक व कुटुंबातले,
फक्त एकमेकाला बघतात,
एखाद दुसरा शब्द बोलतात,
पण काळजातलं दुःख दाबतात.
जाणे येणे न ठेवणे,न भेटणे , न बोलणे,
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका ,
गाठी उकलायचा प्रयत्न करा ,
जास्त गच्च होऊ देऊ नका.
धावपळ करून काय मिळवतो ,
याचा जरा विचार करा ,
बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा ,
आपल्या माणसांची मनं भरा .
एकमेका जवळ बसावं बोलावं,
आणि नेहमी नेहमी,
तिरपं चालण्याच्या ऐवजी,
थोडं सरळ रेषेत चालावं
समुद्री चोहीकडे पाणी ,
आणि पिण्याला थेंबही नाही,
अशी अवस्था झालीय माणसाची ,
यातून लवकर बाहेर पडा.
चर्चा करून उपाय शोधा,
नसता Convent , CBSE,MBA , IIT , MS ,पॅकेज,
Business & managements skill, Second Home , Europe Tour, Registry , Dimond Jwelary ,
याला काहीही अर्थ उरणार नाही
माणसं अन माणुसकी नसलेली घरे,
अन देव नसलेले देव्हारे ,
कितीही पॉश असले ,
तरी त्याचा काय उपयोग ..
Leave a Reply