मला मंत्रालयात काही कामानिमित्त अनेकदा ( नाईलाजाने) जावं लागतं..
तेथील कर्मचाऱ्यांची वागणूक, बॉडी लॅंग्वेज, जनतेला तुच्छ समजण्याची ब्रिटीशकालीन सवय अनुभवली की पुन्हा इथं पाय ठेवू नये असं वाटतं..अगदी ‘माझं सरकार’ आलं असलं तरीही..
मंत्रालयाच्या (नांव बदललं तरी ते सचिवालयच आहे हे कोणीही कबूल करेल) इमारतीच्या रचनेपासूनच सामान्य जनतेची पिळवणूक होते. नक्की कोणत्या मार्गाने जायचे व कोणत्या मजल्यावर हे अनेकदा तीथं जाऊनही कळत नाही.. ‘मेझ’ नांवाच्या भुलभुलैयासारखं आहे सारं आणि मग दलालांचा आधार घ्यावा लागतो..
येवढे कष्ट घेऊन एखादा पोचलाच इप्सित स्थळी तर साहेब मिटींगीत..त्याचा उत्साहच मावळतो आणि सरकारविषयीच्या चिडीच्या खात्यावर आणखी एक गुण जमा होतो..
गेटवर प्रवेश देण्ऱ्याऱ्या हात-गळा सोन्यानं भररलेल्या कर्मचाऱ्यापासून जनतेला तुच्छतेची वागणूक मिळायला सुरूवात होते तर दुसरीकडे काही रुबाबदार मंडळी गेटवरच्याचा सलाम स्विकारत गेटपासशिवाय आत जाताना दिसतात आणि हात-गळ्याला झालेल्या काविळीचं मुळं सापडतं..
कोणत्याही खात्यातील कुठल्याही श्रेणीतल्या कर्मचाऱ्याने अंगावर खेकसल्याशिवाय बोलायचंच नाही असा पण केलेला असतो की काय अशी शंका येते..किंबहूना उद्धटपणा हे एकमेंव क्वालिफिकेशन तिथल्या नेमणूकीसाठी लागत असावं हे माझ तरी ठाम मत झालेलं आहे..जेवढे आपले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ‘आपले’ वाटतात, तेवढंच प्रशासन ‘सावत्र’ वाटतं यात शंका नाही..अर्थात, सर्वच कर्मचारी तसे नसावेत मात्र मला भेटलेले सर्वच तसे होते यात माझ्या नशिबाचाच दोष असावा..मंत्रालयात नशिब वाईट असेल तरच जावं लागत असावं बहुतेक..नशिबावरचा विश्वास पक्का होतो.
सचिवांना पत्र लिहायचं तर ‘सन्माननिय महोदय’ लिहीणं हे समजू शकतो पण तेच पत्र सचिवाकडून एखाद्या सामान्य माणसाला लिहायचं तर केवळ ‘महोदय’ असं का? या वर माझा एकदा वादही झाला होता. कर्मचाऱ्यांचं म्हणणं, की सचिव ‘सर्वोच्च’ व त्यामुळे ते सन्माननिय आणि जनता ही केवळ महोदय वा महोदया..मी त्याला सुनावलं की सचिव तुझा साहेब असला तरी जनतेचा नोकरच आहे व जनतेला ‘सन्माननिय’ म्हटलं गेलं पाहिजे..
इथे विषय संबोधनाचा नाही तर जनतेकडे प्रशासन काय नजरेने पाहातं त्याचा आहे..फार चिड आणणारं आहे सर्व..
— गणेश सांळुखे
Leave a Reply