नवीन लेखन...

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग १

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ६०

वेदामधून घेतलेले, जवळपास सर्वांचेच पाठ असलेले, हे मंत्रपुष्प ही आपली भारतभूची राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे कोणाला माहिती नसेल.
ही जणु काही शपथ आहे.

देवाच्या समोर उभे राहून एका सर्व शक्तीमान शक्तीला शरण जाऊन सांगतोय, की हे राष्ट्रदेवते, मी तुला साक्ष ठेऊन ही शपथ घेतोय,

“यज्ञेन यज्ञ मयजन्त देवा……

यातील ताल आणि सूर हे इतके आकर्षक आहेत, की कोणालाही याचे अर्थ कळले नाहीत, तरी हे आपण म्हणावे असे वाटते.
मुळात संस्कृत मधे असलेली ही रचना, उच्चारायला जरा कठीणच आहे. कारण नेहेमीच्या बोलीभाषेतील संस्कृत वेगळे आणि वेदातील संस्कृत वेगळे, त्याचे व्याकरण पण वेगळे !

आम्हाला आमची मराठी भाषाच उच्चारताना कठीण होत चालली आहे, “भेटणे” आणि “मिळणे” हे शब्द कुठे वापरायचे, हेसुद्धा आम्ही विसरून गेलो आहोत, वस्तु मिळतात आणि माणसे भेटतात हे विसरून “माणसाना वस्तु भेटतात,” इथपर्यंत आमचे व्याकरण आलेले आहे, अशांना शुद्ध मराठी शिकवणे किती कठीण होईल. मग संस्कृत आणि वेदातील संस्कृत या गोष्टी तर फार दूर राहिल्या !

उदाहरण द्यायचे झाले तर अनुष्टुप छंदातील रामरक्षा ही संस्कृत व्याकरणाचा परमोच्च बिंदू आहे. त्यातील रामो राज्यमणि सदा विजयते, हे पद्य सर्वांनाच पाठ आहे. व्याकरणातील सर्व विभक्ती प्रत्यय या छंदकाव्यात सहजपणे येऊन जातात. व्याकरण सोपे आहे. आजच्या भाषेत पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा विषय. आमच्या शिक्षणातून जवळपास हद्दपार होत आला असला तरी ओठातून काही जात नाही, जाणारही नाही.

रामरक्षा ही समजून घ्यायला सोपी आहे. अर्थ समजत नाही, असे नाही.
पण वेदातील या मंत्रपुष्पाचे अर्थ संस्कृत बोलता येत असणाऱ्या तज्ञाला समजणे देखील कठीण. यातील शब्दांची फोड कुठे करावी, हेच समजत नाही.

शब्द वाचण्यापेक्षा ते उच्चारणे जास्ती महत्त्वाचे असते. म्हणून संस्कृत उच्चार हे गुरुमुखातून शिकून घ्यावे लागतात. उच्चार चुकला की अर्थ चुकला. म्हणून कदाचित यात काही अर्थ नाही, असे काही राज्यकर्त्यांना वाटले असेल. असो.

तर मंत्रपुष्प ही वैदिक शपथ आहे. एका विशिष्ट लयीमधे, बेंबीच्या देठापासून, म्हणजे ज्याचे उच्चार हे परा पश्यंति मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी प्रकारातून उच्चारले जातात. तीव्र स्वरात आणि आर्ततेने म्हटली जाणारी वेदातील ही ऋचा आहे.

वेदातील ऋचांचे अर्थ लावणे हे महाकठीण काम. एकेका ऋचेचे अनेक अर्थ होत असतात. वेदातील ऋचांचे अर्थ लावणे म्हणजेच एखाद्या छुप्या संदेशातील शब्दांचे कोडींग आणि डीकोडींग केल्यासारखे होते. हे खरोखरच दिव्य काम आहे.

ज्याने ही शपथ घेतली तो राष्ट्रापासून दूर जाऊच शकत नाही, एवढी ताकद या शपथ घेण्यामधे आहे.

अहो, आमदार खासदारांना देखील शपथ घेताना राज्यपाल आणि महामहिम राष्ट्रपतींना, त्यांना एकेक बोलीभाषेतील एकेक शब्द शिकवावा लागतो. म्हणजेच शपथ ग्रहण करताना, आमदार खासदारांना राज्यपाल आणि राष्ट्रपती हे जणुकाही संथाच देतात. त्यांचे गुरु झाले. मग वेदातील ऋचा शिकायला गुरू नको का ?

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
२४.०७.२०१७

आजची आरोग्यटीप

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..