नवीन लेखन...

माणुसकीचा दूत

मिलिंद भावसार यांचा हालेख WhatsApp वरुन आला. शेअर करतोय


ठाण्यात कँडबरी कंपनीपासून वर्तक नगरपर्यंत रस्तारूंदीकरणाचं काम सुरू आहे. रिक्षातून जात असताना तिथे मला एक अजब व्यक्ती दिसली. पांढ-याशुभ्र कपड्यातली चाळीशी-पंचेचाळीशीतली ती व्यक्ती काय करत होती?…भर दुपारी एक वाजता साफ भाजून काढणा-या उन्हात रस्ता रूंदीकरणाच्या कामात मोलमजुरी करणा-या त्या मजूरांना “लो लो भाई, लो बहन” म्हणून अतिशय प्रेमाने त्याच्या मिनी बसवजा गाडीतून पोळीभाजीचं पाकिट देत होता, त्याच्याबरोबर अमूलचं ताक असलेला स्ट्रॉसकट खोका देत होता, त्वचेचे विकार होऊ नयेत कसली कसली मलमं असलेल्या ट्युब्स देत होता.

माझं सहज लक्ष गेलं म्हणून मी रिक्षा थांबवली आणि कुतुहल म्हणून त्याच्याजवळ गेलो.

मी म्हणणारं ऊन, अंगाची होणारी लाही, घामाने निथळणारं अंग असं सगळं त्रासदायक वास्तव असतानासुध्दा या गृहस्थाचं त्या मजुरांना बोलवून बोलवून “लो भाई, लो बहन” चालूच होतं. मी त्याच्याजवळ पोहोचलो याची त्याला जाणीव झाली, पण माझ्याशी अस्फुट हसत त्याने ते आपलं काम चालूच ठेवलं.

या माणसाला तापलेल्या सडकेवर पोट जाळण्यासाठी विनातक्रार काम करणा-या त्या मजुराबद्दल एक पराकोटीची सहवेदना असावी याचा अंदाज मला एव्हाना आला होता.

मी कुतुहल म्हणून त्याला नाव विचारलं.

उत्तर आलं, “फारोक बिलीमोरिया”

“यह भी इन्सान है, इनके बारे में किसी ने तो सोचना चाहिए ना!”, मी न विचारताच त्याने पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

“आप कितने सालों से यह सब…”, असं मी काही त्याला विचारत होतो…इतक्यात त्याने माझा तो प्रश्न तोडला,…आणि अत्यंत अजिजीने तो मला म्हणाला, “देखिये, सेवाभाव में कोई सवालजवाब नही होते”

मला कळलं की या गृहस्थाला आपल्या कार्याबद्दलच्या किंचित स्तुतीचंही वावडं आहे. पुढे मी काही बोलणं शक्यच नव्हतं, त्यानेही माझ्याकडे पाठ फिरवून त्याचं काम बिनबोभाट चालू ठेवलं. “लो भाई, लो बहन म्हणत तो गाडीतून भाजीपोळीचं पाकिट, ताकाचा खोका, त्वचाविकारांवरची मलमं मजुरांना तो हाका मारून प्रेमाने देत होता.

…थोड्याच वेळात मला ते ऊन असह्य झालं आणि मी रिक्षात बसलो. रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली आणि म्हणाला, ” साहेब हा माणूस त्यादिवशी मानपाड्याच्या रस्त्यावरसुध्दा अशीच या मजुरांना मलमं वाटत होता”

मी विचार केला, हा माणूस वेगळा आहे, या माणसातला माणूस वेगळा आहे, हे मजूर काही त्याच्या वॉर्डातले मतदार नव्हेत, हा काही कोणता नेता नव्हे, उन्हाळ्यात घामामुळे मजुरांना त्वचाविकार होत असतील याची त्याला काळजी किंवा सहवेदना, ऊन्हाळ्याला साजेसं भाजीपोळीचं जेवण आणि वर ताक…

मला विंदांची कविता आठवली…परदु:खाने रडला प्राणी, देव प्रगटला त्याच ठिकाणी.

माझी खात्री पटली, तो खरंच देव होता, माणसाची वेदना जाणणारा माणसांमधला देव…

मनात विचार आला, बरं झालं तो कुठल्याशा बँनरवरला, होर्डिंगवरला कुणी कार्यसम्राट नव्हता.

…खरंच मला आज माणुसकीचा दूत दिसला होता, स्तुतीची शाल लपेटण्याचा जबरदस्त तिरस्कार असणारा आणि कुठल्याच पुरस्काराचाही कणभरही हव्यास नसणारा माणूसपणाचा खराखुरा पाईक!!

— Received from WhatsApp

Avatar
About अमित कुळकर्णी 14 Articles
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..