मन्या इंजिनियर फिरता फिरता
बघायाचा नुसत्याच पोरी;
म्हणायचा अन मनाशीच की
पटविन मी, हि सरीता गोरी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.
ऑफिसातली ड्रॉईंग्ज बघणे;
जिग, फिक्स्चर जॉब्ज अर्जंट,
ऑइल तेल अन कुलंट नळीचे
चेकिंग करणे आकडे कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा मशीनचा
धडधड जळत्या; आणि लेटणे
वाचित स्टोऱ्या रस्किनच्या.
गोरी सरीता उजून गेली
कोमल कविता गोष्ट राहिली;
चिमणी पाखरं उडून गेली;
मन्या आणि मशीन धडधड.
कंपनीतली लंबू बॉब कट
विचारण्याचा घाली घाट
एक दिवस ती हि पटली
अकाउंटंटला गप्पात गटली.
मुली मन्याने स्वप्नील्या ज्या ज्या
लगेच खपल्या उजल्या गेल्या,
मनातल्या मनात मन्याच्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.
अमेरिकेची करिअरिस्टिक
नात्यातून ती आली अचानक;
ऊंच स्मार्ट अन भलतीच नीटस्
डॉलर्सची हि मन्यास ऑफर.
मन्या बिचारा हुशार बापडा
पोरी बघता राहून गेला;
पण, एक मागता गाड्या चार
देव देतसे नशीबवंताला!
HAPPY ENGINEER’S DAY.
– बा.सी.मर्ढेकर क्षमा करा.
— विनय भालेराव .
Leave a Reply