स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८
भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. यातील सैनिकांना गणपत असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.
मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. या पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. पुर्वी ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पुर्वीहे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्याहमुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.
या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटेमिया या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून पॅलेस्टाईनमधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इटलीमधील केरेन व आसाम, ब्रह्मदेशमधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.
त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला.
आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय.
मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना “बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…!!” अशी जबरदस्त आहे…
हि एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, एका महापुरूषाच्या नावाने आहे…
मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना ‘छ.शिवाजी महाराज की जय’ ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल.
१९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे.या प्रांतात उंच अशा डोंगररांगा आहेत.या डोंगररांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव “डोलोगोरोडाँक”.हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती.बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता.परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये एक ‘श्रीरंग लावंड’ नावाचे एक सुभेदार होते, त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून देऊ. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांनी ही परवानगी दिली.
नंतर आपल्या लोकांनी ‘बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ म्हणत एका रात्रीत किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहाणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply