नाना पळशीकर म्हणजे नारायण बळवंत पळशीकर यांचा जन्म २० मे १९०८ रोजी मध्यप्रदेशातील भंडारा येथे झाला.
नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्ह्णून डॉ. हेगडेंवार तेथे नाना पळशीकर यांनी एक छोटा कार्यक्रम केला होता. तो पाहून त्यांनी नानांची प्रशंसा केली आणि म्हणाले , ” तू खूप चांगला अभिनय करतोस, तू सिनेमात गेलास तर चांगले नांव कमवशील .” त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे नाव ‘ नाना पळशीकर ‘ असे केले. चित्रपट क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने नाना प्रभात कंपनीत पुण्याला गेले. पण तिथे काम मिळाले नाही. मग ते मुंबईला गेले आणि तिथे रोज एक रुपया रोजंदारीवर रणजित स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यावेळी रणजीत स्टुडिओत १९३५ साली ‘ देशदासी ‘ या चित्रपटाचे काम चालले होते. त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर ‘ बॅरिस्टर की बीबी ‘ या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. पुढे काहीतरी काम मिळाले पाहिजे असा विचार करता असताना द्वारका प्रसाद जे मध्यप्रदेशचे गृहमंत्री होते त्यांच्याशी त्यांची भेट झाली. ते ‘ धुवादार ‘ चित्रपटाची निर्मिती करत होते त्यांनी नाना पळशीकर यांना त्या चित्रपटासाठी करारबद्ध केले. त्यातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या ‘दुर्गा ‘, ‘नया संसार’ , ‘कंगन’ , ‘आझाद’ या चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना खुपच प्रसिद्धी मिळाली.
त्यांच्या नावाचा बोलबाला पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिर मध्ये बोलवून घेतले. त्यांना ‘माली’ या हिंदी चित्रपटात आणि ‘भक्तीचा मळा’ या मराठी चित्रपटात भूमिका दिली. ‘माली’ या चित्रपटासाठी त्यांनी एक हिंदी गीतही लिहिले. ‘भक्तीचा मळा’ हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली.
त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटात कामे करण्यास वेळही मिळत नसे. तरीही १९५५ च्या ‘मूठभर चणे ‘ , १९६२ च्या ‘प्रेम आंधळं असतं’ आणि १९६३ च्या ‘फकिरा’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे ‘जेम्स आयव्हरीच्या ‘द गुरु’ नावाच्या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी काम केले. ह्या चित्रपटात काम केल्यावर जेम्स यांनी विधान केले की, “त्यांना जेव्हा ह्या चित्रपटात घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती की ते इतके चांगले आणि प्रामाणिक कलाकार आहेत ते.” त्यांच्या त्या कामाची न्यूयॉर्क मॅगझीनने देखील प्रशंसा केली होती.
नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ‘ कानून ‘ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्ह्णून ‘फिल्मफेअर’ पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतमहोत्सवनिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषीक देण्यात आले.
नाना पळशीकरांनी ज्या चित्रपट भूमिका केल्या त्यांची नावे कंगन, कुवारा बाप ( १९४२ ) , दो बिघा जमीन, बाप बेटी , श्री.४२० , जेलर , अनाडी , दोस्ती , शेर और सपना , कानून, माया , हेमराज , आखरी खत , आदमी और इन्सान , ललकार , शोर, धुंद, प्रेम पर्वत , आक्रोश , गांधी , आणि शेवटचा चित्रपट कानून क्या करेगा. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या आहेत . असा प्रश्न त्यांना एकाने विचारला असता ते म्हणाले होते झालो की , ‘ प्रेम पर्वत ‘ या चित्रपटात वयाच्या ७५ व्या वर्षी हिरो होतो. अर्थात त्या चित्रपटाचे कथानक फार वेगळे होते. माझी त्यांची भेट ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर झाली, त्यावेळी कॉलेजमध्ये होतो , भारतीय संघातले काही क्रिकेटपटू सामना खेळण्यासाठी आले असताना पॅव्हेलियनच्या प्रेक्षागृहात नाना पळशीकर होते आणि त्यांच्या बाजूला विजय मांजरेकर आणि अन्य सिनियर खेळाडू होते.
नाना पळशीकर यांचे मुबंईत २ जून १९८४ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी मुबंईत निधन झाले.
सतीश चाफेकर.
Leave a Reply