नवीन लेखन...

मराठी अभिनेते राम नगरकर

राम नगरकर यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला.

राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून. राम नगरकर हे मूळचे अहमदनगर जवळील सारोळे गावचे. १९४७ च्या सुमारास काही कारणामुळे नगरकर परिवाराला मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. राम नगरकर यांचे फारसे शिक्षण झाले नव्हते. तरुणपणात देशासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ते राष्ट्र सेवा दलात जायला लागले. तिथे त्यांचा परिचय एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे तसेच निळू फुले, दादा कोंडके यांचाशी झाला. हे सर्वजण पथ नाट्यातून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे. या पथनाट्यतूनच राम नगरकर यांच्या कलाप्रवासाची बीजे रोवली गेली.

कला पथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि राम नगरकर यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य सुरू केलं. त्यांनी त्याचे हजारो प्रयोग केले. त्यामुळे या लोकनाट्यला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं होते. यात राम नगरकर केलेली हल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेलं ‘हल्ल्या थिर्र’ हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या लोकनाट्यमुळं दादा कोंडके आणि राम नगरकर हे नाव घराघरात पोचलं. नंतर निळू फुले आणि राम नगरकर यांचं ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि कथा अकलेच्या कांद्याची’ हे या दोन लोकनाट्यांनी देखील धुमाकूळ घातला आणि मग आला या जोडीचा ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा. ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ सत्तरच्या दशकात आलेला हा सिनेमाही खूप गाजला. या चित्रपटातील ‘कशी नखऱ्यात चालतीया गिरणी’ हे तेव्हा प्रचंड गाजलेलं गाणं होते.

पुढे राम नगरकर यांचे ‘बायांनो नवरे सांभाळा’, ‘लक्ष्मी’ आणि ‘एक डाव भुताचा हे चित्रपटही हिट झाले. शूटिंग किंवा नाटकाच्या प्रवासाच्या दरम्यान राम नगरकर त्यांच्या त्यांच्या आयुष्यात झालेले अनेक किस्से सांगून सर्वांना खूप हसवत. हेच किस्से एकत्र करून त्यांनी ‘रामनगरी’ हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. याला प्रस्तावना होती दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे यांची. त्यामुळे रसिकांनी हे पुस्तक डोक्यावर घेतलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ही मिळाला. हे पुस्तक अभिनेते अमोल पालेकर यांनी वाचलं. त्यावर त्यांनी ‘ रामनगरी’ हा हिंदी सिनेमा काढला. त्यात प्रमुख भूमिकाही राम नगरकर यांनीच केली. त्यात निळू फुले यांनीही भूमिका केली होती. त्याच दरम्यान प्रसिद्ध नाटककार आणि लेखक सुरेश खरे यांनी ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम सुरू करण्याची संकल्पना मांडली. ते म्हणाले मी बसवून देतो हा कार्यक्रम, या गोष्टीला राम नगरकर यांनी तात्काळ होकार दिला आणि मग सुरू झालं ‘रामनगरी’ नावाचा झंझावात. या ‘रामनगरी’चे देशात तसेच अमेरिका, कॅनडा, दुबई हजारो कार्यक्रम झाले.

राम नगरकर यांचे ‘वंदन हेअर कटींग सलून’ हे पुण्यातील टिळक रोड वरील प्रसिद्ध दुकान. कार्यक्रम नसतील तेव्हा या दुकानाच्या बाहेरील कट्ट्यावर निळू फुले आणि राम नगरकर पानसुपारी खात बसलेले असायचे. त्यांच्याकडे सर्वजण कौतुकाने पहायचे. त्यातील काही जण ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ अशी हाकही मारायचे. हे दोघे त्यांना हात हलवून प्रतिसाद द्यायचे. १९९५ साली राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले. त्यांनीही ‘रामनगरी’चे असंख्य प्रयोग केले आहेत. ‘राम नगरकर यांचे ८ जून १९९५ रोजी निधन झाले.

रंगभूमी आणि चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना खळखळून हसविणारे अभिनेते राम नगरकर यांची आठवण कायम राहावी म्हणून नगरकर कुटुंबीयांनी एकत्र येऊन नुकतीच पुण्यात ‘राम नगरकर कला अकादमी’ स्थापन केली आहे. या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील जनता सहकारी बँकेजवळ ही कला अकादमी सुरू करण्यात आली आहे.

संजीव वेलणकर
९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..