नवीन लेखन...

बंडखोर लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडूलकर

Marathi Actress and Author Priya Tendulkar

विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर  यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.

प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका – अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या. वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ‘तो राजहंस एक’ हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी ‘बेबी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘सखाराम बाईंडर’, ‘कन्यादान’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘फुलराणी’ आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या ‘कळी एक फुलत होती’ या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली. बासू चतर्जींनी तिला ‘रजनी’ या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी ‘प्रिया तेंडूलकर टॉक शो’ सुरू केला. या ‘शो’त त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर ‘अडोस-पडोस’, ‘जिंदगी’, ‘खानदान’, ‘बॅ. विनोद’, ‘हम पाँच’, ‘दामिनी’ यांसारख्या मालिकांतून त्यांनी आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले.

श्याम बेनेगल यांना १९७४ साली ‘अंकुर’ चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला घ्यावेसे वाटले आणि ही अभिनेत्रीही बनून गेली. ‘गोंधळात गोंधळ’, ‘माळावरचं फूल’, ‘मायबाप’, ‘देवता’, ‘राणीने डाव जिंकला’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘माहेरची माणसं’, ‘सस्ती दुल्हन महँगा दुल्हा’, ‘कालचक्र’, ‘माझं सौभग्य’, ‘हे गीत जीवनाचे’, ‘और प्यार हो गया’, अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या. गुजराती मराठी चित्रपटांतील काही भूमिकांबद्दल त्यांनी अभिनयाचे पुरस्कारही मिळवले.

आपल्या चित्राची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. बी. ए. झाल्यानंतर जे. जे. मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही दोन वर्षे घेतलेल्या प्रियाला केवळ चित्रकला शिक्षिका व्हायचे नव्हते. ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’ हा तिचा कथासंग्रह दमाणी साहित्य पुरस्कार देऊन गेला. ‘जगले जशी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘जावे तिच्या वंशा’ आदी पुस्तकांनी तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळवून दिला. एक वेगळया वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला.

प्रिया तेंडुलकर यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..