मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडिता सुहासिनी मुळगावकर यांचा जन्म २७ जून १९३५ रोजी झाला.
सुहासिनी मुळगावकर हे नाव मराठी संगीत आणि रंगभूमीला लाभलेलं वरदान होत. सुहासिनी मुळगावकर हे नाव १९७० च्या दशकामध्ये सांस्कृतिक संदर्भात वारंवार ऐकू येत असे. मुंबई दूरदर्शनवर होणाऱ्या अनेक संगीत विषयक कार्यक्रमांच्या त्या निर्मात्या होत्या. मराठी रंगभूमीवर आधारित प्रतिभा आणि प्रतिमा हा त्यांचा दूरदर्शन वर सादर होणाऱ्या अनेक कार्यक्रमा पैकी सर्वात नावाजलेला कार्यक्रम होता. प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात सुहासिनी मुळगावकर मराठी नाट्य क्षेत्रातल्या मान्यवर कलाकारांना आमंत्रित करून त्यांची मुलाखत घेत असत आणि जर तो कलाकार गायक असला तर त्या कलाकाराला सुहासिनी बाई नाट्य संगीत सादर करण्याचा आग्रह करत. त्यांची आमंत्रित कलाकाराला आग्रह करायची पद्धत काही और होती. जरा लाडात येउन आणि कलाकाराच नाव घेऊन त्या नेहमी आग्रह करीत असत. उदाहरण द्यायचं झालं तर “गाणार ना गंधर्वजी” अस म्हणत त्यांनी कुमार गंधर्व ना गाण्याचा आग्रह केला होता.
सुहासिनी मुळगावकर यांनी आपले संगीताचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्या कडून घेतले. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली व याचे त्यांनी ५०० हून अधिक प्रयोग केले होते.
सुहासिनी बाईंनी शतरंग,सदाफुली,सफारी, मनमोकळं ही पुस्तके लिहिली आहेत.
सुहासिनी मुळगावकर यांचे १३ जून १९८९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply