नवीन लेखन...

मराठी अभिनेत्री रंजना देशमुख

सुप्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या असलेल्या रंजना देशमुख यांनी लहानपणीच कलाक्षेत्रात पदार्पण केले. पुढे १९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या.

व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. ‘अरे संसार संसार’ आणि ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना देशमुखला राज्यसरकारचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

रंजना देशमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’. रंजना देशमुख यांनी ‘फक्त एकदाच’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. मराठी १९८७ मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने त्यांची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली.

रंजना यांचे ३ मार्च २००० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on मराठी अभिनेत्री रंजना देशमुख

  1. Ranjana also played heroine of marathi chitrapat ” PATALIN “” produced in SANGLI under : VASANTDADA PATIL” s banner , Great Chandrakant was in AGED HERO’s role Other actors include vasant shinde , mukund gokhale .dr. madhu apte

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..