शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रवास करणारा नेता राज ठाकरे आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जी राजकारणात गरुडझेप घेत आहे, ती अनेक राजकीय दिग्गजांना विचारात ठाकणारी आहे.
शिवसेना सोडल्यानंतर हा नेता नेमके काय करणार हा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र राज ठाकरे यांनी दुसर्या तिसऱ्या पक्षात प्रवेश करण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. व पक्षापुढील आव्हानेही तेवढ्याच समर्थपणे पेलत या पक्षाला अल्योवधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचविले.
केवळ एका वर्षाच्या कारकिर्दीतच या पक्षाने महाराष्ट्रातील वहानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आदी ठिकाणी आपल्या पक्षाचे सदस्य निवडून आणले.एवढ्या कमी वेळेत राज ठाळरेंना मिळालेले यश अनेकांना दीपविणारे आहे. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, अमोघवाणी, संघटन कौशल्य, नेतृत्वगुण त्यांच्या पक्षातील माणसांना नव्हेतर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आकर्षित करणारे आहे. आजही ते सेनेबाहेर असूनसुध्दा सेनेचा बहुसंख्येवर्ग त्यांना आपला मानणारा आहे.
परप्रांतियांच्या आक्रमनात घायाळ झालेल्या मराठीमनावर राज ठाकरे यांनी जो फुंकार घातला तो मराठी वाटला. त्यामुळे लढाईत अख्खे मराठी मन त्यांची ही भूमिका काही वाटते मात्र परप्रांतियांच्या मनाला पार मोठा हायसा परप्रांतियांच्या विरोधातील त्यांच्या बाजूले उभे राहिले.
राजकारण्यांना चुकीची झळा ज्यांनी अनुभवल्या त्यांना राज ठाकरेंचा हा परप्रांतियांविरोधातील लढा आकर्षित करतो आहे. याहीपुढे जाऊन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन शासकीय तसेच खाजगी कंपनीत मराठी तरुणांचा जास्तीत भरणा करावा असे कंपनी मालकांना सांगिलते.
महाराष्ट्राची सध्याची अवस्था अन राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही सबंध महाराष्ट्रातील मराठी मनाला नवसंजीवनी सारखी वाटत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वळणारा वर्ग हा दिवसेंदिवस वाढत असून राज यांच्या यशस्वी राजकारणाची ती नांदी ठरत आहे. येत्या काही काळातच हा नेता सबंध महाराष्ट्रावर अधिराज्य करेल यात शंका नाही.
विद्याधर ठाणेकर
14 जुन 2008
Leave a Reply