पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला.
त्यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी झाला. शिक्षकीपेशात असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.
प्रेम, जीवनातील व्यथा, संघर्षातून आलेले अनुभव, निसर्ग, भक्तीभाव, स्त्रीत्वाच्या वेदना,मानवी नाती असे नानाविध विषय त्यांच्या काव्यातून बहरत जातात कधी ओठावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी ! त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर आलेली संकटे अन त्यावर त्यांनी केलेली मात याचे ठसे इंदिरा संत यांच्या कवितात जागोजागी आढळतात. इंदिरा संत आणि त्याचे पती ना. मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह ‘सहवास’ या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला.
विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता ‘मृण्मयी’ नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. मा.इंदिरा संत यांचे १३ जुलै २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इंदिरा संत यांची कविता.
कुणी निंदावे त्यालाही
करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा
त्याचा करावा सत्कार
काही वागावे कुणीही
मीच वागावे जपून
सांभाळण्यासाठी मने
माझे गिळावे मीपण
कित्येकांना दिला आहे
माझ्या ताटातील घास,
कितिकांच्या डोळ्यातील
पाणी माझ्या पदरास!
आज माझ्या आसवांना
एक साक्षी ते आभाळ
मनातील कढासाठी
एक अंधार प्रेमळसंत
NICE WRITTING