ज्ञान प्रबोधिनी, फिलिप्स कंपनी, नाटक, सिनेमा, विनोदी मालिका, लेखन असा सुप्रसिध्द लेखक शिवराज गोर्ले यांचा जीवनप्रवास. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५१ रोजी झाला.
फिलिप्स इंडिया लि., किर्लोस्कर कन्सल्टंटस लि. या सारख्या कंपन्यांमध्ये पर्सोनेल व मार्केटिंग क्षेत्रात काम करत असताना त्यांनी लेखन चालू केले. त्यांच्या ‘ मजेत जगावं कसं? ‘ या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ ९ दिवसात संपली. हा मराठी साहित्य विश्वात एक विक्रम मानला जातो. त्यानंतर माणसं जोडावी कशी? ,स्त्री विरुद्ध पुरूष,सुजाण पालक व्हावं कसं? ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
नाटक आणि चित्रपटासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘ कुर्यात सदा टिंगलम्,गोलमाल बुलंद, अनैतिक , कुर्यात पुन्हा टिंगलम , भांडा सख्य भरे .. ही यशस्वी ही नाटकं प्रसिद्ध आहेत. कुर्यात सदा टिंगलम .. या पहिल्याच नाटकाला विक्रमी यश मिळाले त्याचे १२०० हून अधिक प्रयोग झाले. व गोलमाल या नाटकाचेही ७०० प्रयोग झाले. थरथराट ‘ या चित्रपटाच्या संवाद लेखनाने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. थरथराट हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्या नंतर त्यांनी खतरनाक, धुमाकूळ, बंडलबाज, बाप रे बाप, बजरंगाची कमाल, सवाल माझ्या प्रेमाचा, सूडचक्र, चिमणी पाखर.. आदी चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन केले. घरकुल ‘ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे लेखन शिवराज गोर्ले यांनीच केले आहे. त्यांनी नग आणि नमुने हे मराठी तील पहिले ऑडीओ बुक व पुस्तक प्रकाशित केले. त्यांच्या नग आणि नमुने या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय. तर मजेत जगावं कसं या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळालाय.मस्त रहावं कसं हे त्यांचं पुस्तक आहे. त्यांनी उद्योग विश्वातील संघर्षावर आधारित ‘ सामना ‘ ही ५०० पानी कादंबरी लिहिली. शिवराज गोर्ले यांचा ‘मेख ‘ व’फिट्टमफाट ‘ हे विनोदी कथा संग्रह व ‘ नग आणि नमुने ‘ हा विनोदी व्यक्तिरेखा संग्रह प्रसिद्ध आहे.
शिवराज गोर्ले यांनी ‘स्त्री ‘ ‘ किर्लोस्कर ‘ किस्त्रीम ‘ या नियतकालिकाचे २ वर्षे संपादन केले.
http://www.shivrajgorle.com
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ सुभाष इनामदार
Great ?